• Solapur
 • August 3, 2021
17 Comments

सोलापूर: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना उदय सामंत यांनी १३ जुलै व ४ ऑगस्ट रोजी व्हीडीओ मिटींग घेतली होती. त्यावेळी संघटनेनी केलेल्या ग्रंथालयाचे अनुदान वाढ व इतर मागण्यांची हिवाळी अधिवेशनात अमंलबजावणी करावी. यासाठी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघ पुणे विभागाचे अध्यक्ष सदाशिव बेडगे व उपाध्यक्ष धोंडीराम जेवूरकर यांनी मुंबई येथील शिवसेना संपर्क कार्यालय शिवालय येथे जावून निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. बुधवार दि.16 सप्टेंबर रोजी त्यांनी शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली
यावेळी मंत्री उदय सामंत यांनी संघटनेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांना येत्या हिवाळी अधिवेशनात अनुदान वाढ करण्याची ग्वाही दिली. ते असेही म्हणाले की जर पावसाळी अधिवेशन जास्त दिवस चालले असते तर ग्रंथालय अनुदानात वाढ केली असती.हिवाळी अधिवेशनात ग्रंथालयाचे प्रश्न मार्गी लावतो.तसेच सप्टेंबरला मिळणारे ग्रंथालयाच्या पहिल्या हप्त्याचे अनुदान लवकरात लवकर वितरित करावे. अंशी विनंती केली. कारण ग्रंथालय कर्मचारी यांचे सहा महिनाचे वेतन देय असल्याचे बेडगे म्हणाले.
यावेळी मंत्री उदय सामंत यांचा सदाशिव बेडगे यांनी शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी धोडीराम जेवूरकर उपस्थित होते.

बातम्यांसाठी व ताज्या अपडेटसाठी व्हाट्स ॲप ग्रुपमध्ये हा नंबर 👉 9404996361 ॲड करा किंवा आपले नाव, शहर/गावाचे नाव व्हाट्स ॲप करा

Author

aajtaksolapurnews@gmail.com

17 thoughts on “ग्रंथालय अनुदानात वाढ करणार; उदय सामंत यांची ग्वाही

 1. अनुदान वाढ चांगलीच बातमी आहे.
  आई हिंगलाज माता आपनास नक्कीच येक्ष देईल

 2. महागाई प्रमाणे वेतन मिळाले पाहीजे, त्या प्रमाणात अनुदान वाढ झाली पाहीजे,

 3. अनुदान वाढ चांगली बातमी आहे विशेष आभार प्रयत्न करणार्या मान्य वराचे

 4. श्री बेडगे सर श्री जेवूरकर यांना धन्यवाद ग्रंथालय अनुदान वाढीसाठी केले ले प्रयत्नना यश येवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

 5. खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचे ग्रंथालय अनुदान वाढ बातमी वाचून खूप समाधान वाटले। धन्यवाद

 6. खुप खुप धन्यवाद बातमी चागली आहे.

 7. घनश्याम बळीराम पारधी ग॔थपाल गोदावरी सार्वजनिक वाचनालय कीनही says:

  ना उदयजी सावंत साहेब आपले खूप खूप आभार
  आमची आई वडील मूल बा8 परिवार अनंत अङचणीचा कालातीत आपणास या निणँया बदःल शतशः आभार

 8. एकदम मस्त कामगिरी केली पण ग्रंथपालांना जे विद्यार्थी सख्याची जी अट आहे ती काढावी व 1शाळा 1 ग्रंथपाल याची पुर्ण वेळ नेमणूक करावी ही नम्र विनंती.

 9. आम्ही सर्व ग्रंथालय कर्मचारी मा. सांवत साहेबांचे फार फार आभारी आहोत झोपी गेलेला ग्रंथपाल जागा झाला .

  अशोक लक्ष्मण हुमने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!