• Solapur
  • April 20, 2021
1 Comments

सोलापूर,दि.7 : शहरातील श्रीमंत व्यक्तींनी खाजगी रुग्णालयातील बेड अडवून ठेवू नये जेणेकरून सर्वसामान्य गरीब रुग्णांची वैद्यकीय सेवा देणे शक्य होईल असे आवाहन पालिका आयुक्त उपायुक्त धनराज पांडे यांनी केले आहे. (Wealthy people in the city should not block private hospital beds: Deputy Commissioner Dhanraj Pandey)

मागील काही दिवसापासून सोलापूर शहर परिसरात कोरोनाचा रुग्णाच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे वाढत्या रुग्णाची संख्या लक्षात घेऊन मा आयुक्त यांच्या आदेशानुसार शहरातील 36 हॉस्पिटल हे कोविड साठी घेण्यात आले आहे त्याव्यतिरिक्त 220 हॉस्पिटल हे नॉन कोविड हॉस्पिटल आहेत अशा हॉस्पिटल यांनी समर्पित कोरोना हॉस्पिटल ची संख्या पालिका प्रशासनाकडून वाढविण्यात येत आहे ज्या हॉस्पिटल ना समर्पित कोरोना हॉस्पिटल करण्याची तयारी आहे अशांनी आमच्याकडे अर्ज करावा त्यांना त्याच दिवशी समर्पित कोरोना हॉस्पिटलची मान्यता देण्याचे प्रयोजन करण्यात येईल.

याशिवाय सोलापुरातील श्रीमंत व्यक्तींना कोरोनाचा प्रादुर्भावाची काही लक्षणे आढळून आल्यास समर्पित कोविड रुग्णालयात जाऊन एखादा बेड आरक्षित करू नये अशा श्रीमंत व्यक्तींनी करता खाजगी हॉटेल्स मध्ये व्यवस्था करण्याची करता मान्यता देण्यात आलेली शहरातील श्रीमंत व्यक्तींनी आपले मोठे पण दाखवून समर्पित कोरोना रुग्णालयात गरजू गरीब रुग्णावर उपचार करण्यास संधी उपलब्ध करून द्यावी असेही आवाहन पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी केले.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

One thought on “शहरातील श्रीमंत व्यक्तींनी खाजगी रुग्णालयातील बेड अडवून ठेवू नये : उपायुक्त धनराज पांडे

  1. अशी व्यक्तयवे करण्याचा अधिकारी नाही याची जाणीव असावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *