• Solapur
  • August 3, 2021
0 Comments

दि.19 : पावसाने मुंबईत अक्षरशः कहर केला आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. शुक्रवार मध्यरात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे मुंबईकराचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आज मुंबईसह (Mumbai) एकूण नऊ जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यानं (IMD) रेड अलर्ट (Red alert) जारी केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy to very heavy rainfall) पावसाची शक्यता आहेत. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे.

आज संपूर्ण कोकण विभागाला आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट दिला आहे. तर संबंधित जिल्ह्यात उद्यापासून सलग चार दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसणार आहे. आज मुंबईसह, पुणे, पालघर, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

याशिवाय, पुढील तीन तासांत सोलापूर, मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, उस्मानाबाद आणि घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आकाशात विजांच्या कडकडासह वेगवान वाराही वाहण्याची शक्यता आहेत. त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना, लांबचा प्रवास टाळण्याचा आणि मोठ्या झाडाखाली उभा न राहण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञाकडून देण्यात आला आहे.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!