• Solapur
  • April 20, 2021
0 Comments

दि.1 : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) 21 जानेवारीला आई-बाबा बनले. विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी त्यांच्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. याचसोबत त्यांनी मुलीचं नावही जाहीर केलं आहे. विराट आणि अनुष्काने मुलीचं नाव वामिका (Vamika) असं ठेवलं आहे. याबाबतची इन्स्टाग्राम पोस्ट अनुष्का शर्माने केली आहे.

‘आम्ही प्रेम, जिव्हाळ्याने आमचं आयुष्य जगत आलो आङोत. पण या छोट्या वामिकाने आमच्या जगण्याला वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. अश्रू, हसणं, भावना या सगळ्या गोष्टी आम्ही काही क्षणांमध्येच अनुभवतो. आम्हाला झोप मिळत नाही, पण आमचं मन प्रेमाने पूर्णपणे भरलं आहे. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशिर्वादाबाबत धन्यवाद,’ अशी पोस्ट अनुष्का शर्माने केली आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 21 जानेवारीला आई-बाबा बनले. तेव्हापासूनच अनेकांनी त्यांना मुलीचं नाव सुचवलं होतं. मुलीच्या जन्माआधी विराट कोहली पितृत्वाची रजा घेऊन ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून भारतात परतला होता. आता इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये त्याचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. 5 फेब्रुवारीपासून या 4 टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरूवात होणार आहे.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *