• Solapur
  • August 3, 2021
0 Comments

सोलापूर,दि.22 : सोलापूर शहरात उद्या (दि.23) श्री छत्रपती सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे गर्भवती महिलांना लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट नोंदणी करून लस देण्यात येणार आहे. ज्यांचा दुसरा डोस आहे अशांसाठी व 18 वर्षावरील सर्वांसाठी उद्या लस उपलब्ध नसणार आहे.

ऑनलाईन नोंदणी करता येणार नसून गर्भवती महिलांना ऑन द स्पॉट लस देण्यात येणार आहे. सिव्हील हॉस्पीटल येथे गर्भवती महिलासाठी कोव्हॅक्सीन लसीचा डोस देण्यात येणार आहे. यासाठी गर्भवती महिलांनी आपल्याकडील एएनसी कार्ड, आधार कार्ड व मोबाईल फोन घेऊन सकाळी 10 ते 5 या वेळेत उपस्थित रहावे, सहव्याधी असणा-या गर्भवती महिलानी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन लसीकरणासाठी यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!