• Solapur
  • April 20, 2021
0 Comments

दि.5 : भारतात आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात आढळलेले कोरोनाचे दोन नविन स्ट्रेन धोकादायक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या संदर्भात झी 24 ने वृत्त दिले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचे दोन स्ट्रेन (Corona Strain) अत्यंत गंभीर असून देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचा इशारा CSIR चे प्रमुख डॉ. शेखर मांडे (Dr.Shekhar Mande) यांनी दिला आहे.

त्यांनी ‘झी 24 तास’शी बोलताना ही माहिती दिली. महाराष्ट्रातले दोन स्ट्रेन 15 ते 20 टक्के लोकांमध्ये आढळतायत. जो कोणी व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह येतो, त्याने आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना चाचणी करण्यास सांगण आवश्यक असल्याचे डॉक्टर मांडे म्हणाले.

महाराष्ट्रात चाचण्या वाढणं गरजेचं आहे. हे सुरुवातीपासून आपण करत आलोय. राज्य सरकारने योग्य पाऊल उचललंय. पण लोकांनी शिस्त पाळणं गरजेच आहे. आजच्या दिवशी भारतात दोन लसी आहेत. या फायदेशीर असल्याचे ते म्हणाले.

सध्या लोकांच्या वाढदिवस, लग्नाच्या पार्ट्या, फिरणं सुरु झालं होतं. यावर नियंत्रण ठेवावं, बंद जागेत एकत्र येऊ नये. मास्क शिवाय बाहेर फिरु नये. सरकारचे नियम शिस्तीने पाळावे. स्वत:वर अनुशासन ठेवावं असेही ते म्हणाले.

परिस्थिती गंभीर आहे. इतिहासात जेव्हा अशा परिस्थिती निर्माण झाल्या तेव्हा महाराष्ट्राने देशाला, जगाला दिशा दाखवली होती. या परिस्थितीचा सामना करणे आवश्यक असल्याचे डॉक्टर म्हणाले.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू केले आहेत. कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. राज्यात आज 57 हजार 74 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे निर्बंधांचा पालन करणं अत्यंत गरजेचं आहे.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *