• Solapur
  • May 15, 2021
1 Comments

मुंबई,दि.१८ : महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढल्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेतील लोकांना वगळता इतरांना फिरता येणार नाही. तरी देखील रस्त्यावर गर्दी दिसते. वाहनांची वर्दळ असते.

राज्यात संचारबंदी लागू करूनही रस्त्यावरील गर्दी कमी होत नसल्याने मुंबई पोलिसांनी त्याविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त अत्यावश्यक सेवेसाठी रस्त्यावर फिरण्यास परवानगी असून, अत्यावश्यक सेवेसाठी खासगी वाहनांना आता रंगीत स्टीकर लावावे लागतील, त्याव्यतिरिक्त अन्य गाड्यांवर कारवाई केली जाईल.

डॉक्टर व आरोग्यसेवकासाठी लाल, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूच्या विक्रीच्या वाहनावर हिरवा आणि सरकारी व अन्य महत्त्वाच्या व्यक्तीच्या वाहनांवर पिवळ्या रंगाचे स्टीकर लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.वाहनाच्या पुढील व मागील बाजूला ६ इंच आकाराचे गोल स्टीकर लावायचे आहे. त्याव्यतिरिक्त अन्य वाहने आणि कलर कोडचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबई पोलीस आयुक्त  हेमंत नगराळे दिला आहे. प्रमुख मार्ग व नाक्यावर शनिवारी रात्रीपासून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

उल्लंघनावर करडी नजरअत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्यांना कलर कोड दिला जाणार आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. गाड्यांमधील कर्मचारी अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत आहेत का? याची तपासणी करण्यात येणार आहे. पोलीस, महापालिका, पत्रकार, डॉक्टर, अशा प्रकारे पोस्टर लावून कोणी फायदा घेत आहे का, याचीही पडताळणी केली जाणार आहे.राज्य सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार आपण लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करत आहोत. महत्त्वाच्या चेक नाका, टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे डॉक्टर, नर्सेस्‌, रुग्णवाहिका, रुग्णालये यांनाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे आपण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या गाड्यांसाठी कलर कोड सुरू करत आहोत.- हेमंत नगराळे

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *