• Solapur
  • August 3, 2021
0 Comments

सोलापूर,दि.21 : सोलापूर शहरात उद्या (दि.22) नागरिकांना लस मिळणार आहे. विडी कामगारांना ऑन दि स्पॉट लस मिळणार आहे. यासाठी विडी कामगारांनी आपले ओळखपत्र घेऊन लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.

तर गर्भवती महिलांना श्री छत्रपती सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे लस मिळणार आहे. गर्भवती महिलांना सिव्हील हॉस्पिटल येथे गर्भवती महिलासाठी Covaxin लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. यासाठी गर्भवती महिला आपल्याकडील ANC कार्ड, आधारकार्ड व मोबाईल फोन घेवुन सकाळी 10.00 ते सायं 5.00 या वेळेत उपस्थित रहावे. सहव्याधी असणान्या गर्भवती महिलांनी आपल्या डॉक्टरांचा वैद्यकिय सल्ला घेऊनच लस घ्यावी असे महापालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

शहरातील सोळा लसीलरण केंद्रावर पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. सोळा लसीकरण केंद्रावर प्रत्येकी पहिला 120 डोस तर दुसऱ्या डोस 130 उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ऑन दि स्पॉट पन्नास तर ऑनलाईन पन्नास टक्के डोस हे नोंदणी करून घेता येणार आहेत.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!