• Solapur
  • August 2, 2021
11 Comments

दि.15 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता 10 वीचा ऑनलाईन निकाल उद्या म्हणजेच 16 जुलैला (Maharashtra SSC Results 2021) लागणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.

इयत्ता 10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 12 मे रोजी राज्य सरकारनं इयत्ता 10 वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इयत्ता 10 वीच्या निकालासाठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर करण्यात आली होती. यासाठी 10 जून रोजी मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत शिक्षकांचे प्रशिक्षण व वेबिनार आयोजित करण्यात आले होते. 

उद्या दुपारी एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. विशेष म्हणजे यावेळी कोरोनामुळे दहावीचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार आहे.

या वेबसाईट्सवर चेक करा रिझल्ट

maharashtraeducation.com

mahresult.nic.in

sscresult.mkcl.org

अधिकृत महाराष्ट्र निकाल वेबसाइटला भेट द्या.

मुख्यपृष्ठावरील महाराष्ट्र इयत्ता 10 च्या निकालाच्या 2021 च्या लिंकवर क्लिक करा.

आपणास एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.

आपली क्रेडेन्शियल्स टाइप करा आणि लॉग इन करा.

आपला एसएससी निकाल आपल्या स्क्रीनवर दिसून येईल.

संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउट डाउनलोड करा.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

11 thoughts on “उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार इयत्ता 10 वीचा निकाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!