• Solapur
  • August 3, 2021
0 Comments

दि.21 : पीएम किसान योजने (PM Kisan Yojana) अंतर्गत, पात्र लाभार्थी शेतकऱ्याला वर्षाला 6000 रुपयांचा निधी दिला जातो. 2000 रुपयांच्या तीन हप्त्यात दर चार महिन्यांनी ही रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 2019 साली केली होती. या अंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देण्यात येतात.

किसान सन्मान निधीचा लाभ देशात 42.16 लाख अपात्र शेतकऱ्यांनी घेतला असून, त्यांच्याकडून सरकार 29,927 कोटी रुपये वसूल करणार आहे. महाराष्ट्रात असे 4,45,497 जण अपात्र असून, ते सरकारचे 358 कोटी रुपये देणे लागतात. कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मंगळवारी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार अनुदान योजनेचा लाभ एकूण 42,16,643 अपात्रांनाही दिला गेला. त्यांच्याकडून 29,927 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल केली जाणार आहे. यात सर्वात जास्त शेतकरी आसाम (8.35 लाख), तामिळनाडू (7.22 लाख), पंजाब (5.62 लाख) आणि महाराष्ट्रातील (4.45 लाख) आहेत. 

हेही वाचा तरुणाच्या इशाऱ्यावर नाचतात उंदीर, व्हिडिओ व्हायरल

सुजय पाटील, हिना गावित, श्रीकांत शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील इतर काही सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना तोमर यांनी ही माहिती दिली. योजनेत महाराष्ट्रातील 1.14 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यात 1.10 कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांत सहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले गेले.  लाभार्थी शेतकऱ्यांना सरासरी सहापेक्षा जास्त हप्त्यांत सरासरी 12,545 रुपये मिळाले. नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची नावे राज्य सरकारे करतात.

कोणत्या जिल्ह्यातून किती शेतकरी?
अहमनगर (6.86 लाख), सोलापूर (6.20 लाख), कोल्हापूर (5.47 लाख), सातारा (5.29 लाख ) आणि पुण्यातील (5.14 लाख) सर्वाधिक शेतकरी योजनेचे लाभार्थी होते. ठाणे (1.19 लाख), नंदूरबार (1.28 लाख), पालघर (1.31 लाख), रायगड (1.52 लाख), गडचिरोली (1.52 लाख) आणि सिंधुदुर्गच्या (1.54 लाख) शेतकऱ्यांची संख्या कमी आहे.
 

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!