• Solapur
  • May 15, 2021
0 Comments

दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सकाळपासूनच बैठक घेत आहेत.

कोरोना संकटाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 11.30 वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली, ज्यामध्ये कोरोनाच्या ताज्या परिस्थितीविषयी चर्चा झाली. आता पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील बड्या डॉक्टरांशी संवाद साधत आहेत.

या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी संध्याकाळी देशातील बडय़ा फार्मा कंपन्यांशी चर्चा करतील आणि सद्य परिस्थितीची तयारी तपासतील.

देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी नोंद होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर देशात 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण करण्यात यावं अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान, आता 1 मे पासून देशातील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.

केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला.यापूर्वी सर्वात आधी 60 वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात होती. त्यानंतर 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोव्हिड 19 लस देण्यााच निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

1 मे पासून देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार आहे. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सध्या देशात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये 45 वर्षांवरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *