• Solapur
  • April 20, 2021
1 Comments

दि.8 : भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. लस घेण्यासाठी अनेकजण पुढे येण्यास तयार नाहीत. जनजागृती करूनही लसीकरण मोहिमेस म्हणावा तितका प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

जास्तीत जास्त लोकांचं कोरोना लसीकरण (Covid 19 vaccination) करण्यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. लोकांनी स्वतः पुढे येत कोरोना लस (Corona vaccine) घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहीत केलं जातं आहे. शक्य त्या मार्गाने जनजागृती करण्यात येत आहे. काही नेतेमंडळी स्वत: कोरोना लस घेत आहेत, तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर लसीकरणाच्या बदल्यात लोकांना काही ना काही दिलं जात आहे. आता तर केंद्र सरकारनेही देशपातळीवर एक स्पर्धा सुरू केली आहे. कोरोना लस घेणाऱ्याला केंद्र सरकार 5000 रुपये देणार आहे.

केंद्र सरकारच्या mygov.in या वेबसाईटवर या कोरोना लसीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या या स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या स्पर्धेत ती प्रत्येक व्यक्ती भाग घेऊ शकते, ज्या व्यक्तीने कोरोना लस घेतली आहे. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने कोरोना लस घेतल्यानंतर फक्त एक काम करावं लागेल. कोरोना लस घेताना फोटो काढावा लागेल आणि त्याला लसीकरणाचं महत्त्वं सांगणारी एक छानशी टॅगलाईन द्यावी लागेल. ज्यामुळे लोकांना प्रेरणा मिळेल.

तुम्हाला mygov.in वेबसाइटवरील या लिंकवर तिथं लॉग इन करावं लागेल. तुम्हाला mygov.in लॉग इन आयडीसह, ओटीपीमार्फत किंवा तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटमार्फतही लॉग इन करण्याची सुविधा आहे. तिथं तुम्हाला आवश्यक ती माहिती भरू तुमची एंट्री पाठवा. तिथं तुमचा हा फोटो आणि टॅगलाइन पाठवा.

सरकार या सर्व फोटो आणि टॅगलाइनमधून उत्तम असा फोटो आणि टॅगलाइनची निवड करेल. अशा 10 विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्यांना दर महिन्याला 5000 रुपये दिले जातील. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 31 डिसेंबर 2021 पर्यंतची मुदत आहे.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

One thought on “कोरोना लस घेणाऱ्याला केंद सरकार देणार 5000 रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *