• Solapur
  • August 3, 2021
0 Comments

अक्कलकोट,दि. 22 : श्री स्वामी समर्थ महारांजाच्या जीवन कार्यावर आधारित जय जय स्वामी समर्थ ही मालिका कलर्स वाहिनीच्या (Colors Marathi) माध्यमातून देश- विदेशातील स्वामी भक्तांच्या मना मनात घरा घरात पोहचले असून अल्पावधित काळातच श्री स्वामी कृपेने मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळाला असून, स्वामींचे पात्र केलेले अक्षय मुडावदकर, चौळप्पाचे स्वानंद बर्वे, चंदा विजया आनंद बाबर, राधिका निता पेंडसे, लेखक शिरिष लाटकर, दिग्दर्शक निशांत सुर्वे यांनी गुरूपोर्णिमेनिमित्त तीर्थ क्षेत्र अक्कलकोट येथील पत्रकारांशी मालिकेने घेतलेल्या गरूड झेपेबद्दल गुरूवारचे औचित्य साधून संवाद साधला.

कोव्हिड -19 च्या (Covid – 19) संभाव्य तिसर्‍या लाटेमुळे सर्व कलाकारांनी ऑनलाईन द्वारे साहिल पॅलेस येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस अजित हुक्केरीकर, विक्रांत पाटील, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे पालखी परिक्रमा सहाय्यक संयोजक श्रीकांत झिपरे, अभिषेक झिपरे, विकास पवार, बाबा भुसणुरे, दत्ता माडकर, गोविंदराव शिंदे, प्रकाश शिंदे, महेश साळुंके, महेश डोईजोडे, नागेश बडवणे यांच्यासह विविध वृत्तपत्र, साप्ताहिक, पाक्षिक, मासीकचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जय जय स्वामी समर्थ या मालिकेच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ यांचं जीवनकार्य प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद देखील मिळत आहे. मालिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बर्‍याच घटना घडत आहेत. स्वामींनी नेहेमीच भक्तांचा उध्दार केला आहे. त्यांच्या मदतीसाठी धावून गेले आहेत, त्यांनी अनेक रूप घेतली आहेत मग ते आदिमाया रूप असो वा श्रीपाद श्री वल्लभ रूप. स्वामी समर्थ म्हणजे साक्षात आई माऊलीच आहे, ह्याचा प्रत्यय भक्तांना क्षणो क्षणी येतो. सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांना शासन देणारे स्वामी भक्तांचे पाठीराखे आहेत. लाबाड,दुष्ट दाजीबा आणि रामाचार्याना स्वामी शिक्षा देणार हे नक्की. आजवर त्यांनी केलेले अनेक चमत्कार, लीला गावकऱ्यांनी अनुभवल्या, काहींची स्वामींवर श्रद्धा जडली तर अनेकांनी त्यांना कमी लेखले.

तरीदेखील कोणाच्याही बोलण्याला न जुमानता त्यांनी भक्तांची मदत करणे नाही सोडले. स्वामींनी अनेक भक्तांना प्रचिती आणून दिली. चोळप्पाच्या निस्सीम भक्तीमुळे साक्षात परब्रम्ह स्वरूप स्वामी त्याच्या घरी राहिले. चोळप्पाच्या मुलाची कृष्णप्पाच्या निरागस भक्ती आणि विश्वासामुळे स्वामी चक्क त्याचे सवंगडी झाले. चांदुलीची निरागस, एकनिष्ठ भक्तीच फळ म्हणून स्वामींनी प्रत्येक संकटातून चांदुलीच रक्षण केले आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त मालिकेचा विशेष भाग 23 जुलै रोजी रात्री 8 वा. आपल्या कलर्स मराठीवर (Colors Marathi) दाखवण्यात येणार आहे. जय जय स्वामी समर्थ सोम ते शनि रात्री 8.00 वा. कलर्स मराठीवर दाखविण्यात येत आहे.

आपल्या भवतालच्या प्रत्येक गोष्टीत परमेश्वर आहे. परमेश्वराच नाव घेत स्वत: परमेश्वर व्हा असे सांगणारे थोर सिद्धपुरुष अठराव्या शतकात होऊन गेले ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. गाणगापुराचे नृसिंह सरस्वती कर्दळीवनात गुप्त झाल्यानंतर तब्बल 300 वर्षांचा काळ उलटला आणि एक दिवस कर्दळीवनात लाकडं तोडणाऱ्या एका इसमाच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि तिथल्या वारुळावर पडली. तिथून रक्ताची धार लागली आणि अडसर दूर केल्यानंतर श्री स्वामी समर्थ प्रकट झाले… इथून खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला. अन्यायाला मोडीत काढत आणि मार्गातल्या असंख्य लोकांचा उध्दार करीत. त्यांना उपदेश करीत स्वामी समर्थ कसे सोलापूर येथील अक्कलकोट येथे पोहचले, कशी लोकांना त्यांच्या महानतेची प्रचिती येत गेली, अक्कलकोट येथील चोळप्पाशी, सेवेकरी सुंदराबाई, अक्कलकोटचे राजे मालोजीराव,या भक्तांनी स्वामीलीला अनुभवली आणि कृतार्थ झाले त्यांचे कसे नाते होते आणि या मार्गात आणखी कोणकोणती माणसं श्री स्वामी समर्थांच्या मार्गात आली हे सगळं प्रेक्षकांना या मालिकेमध्ये बघयाला मिळणार आहे.

अक्कलकोट येथे स्वामींच्या वास्तव्याने वटवृक्षाखाली दोन दशके चैतन्य ऊर्जा नांदली ती कशी हे देखील प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ यांनी भारतभर भ्रमण केले. त्यांचे अनुयायी आज संपूर्ण भारतभर नाही तर जगभर पसरलेले आहेत हिमालय, भारत – चीन सीमा, काशी, त्रिविक्रम सरोवर असे भ्रमण करून ते अक्कलकोट येथे स्थिरावले. स्वामी समर्थ यांचं शेकडो वर्षांचं वास्तव्य, सुरस लीला आणि उपदेश यांनी भरलेली कथा असामान्य आणि प्रेरणादायी आहे.

आजच्या काळात यांनी सांगितलेली तत्त्वं, त्यांचे उपदेश असाधारण शक्ती देऊन जातात आणि हेच अत्यंत महत्वाचे आणि मोलाचे आहे. चांगल्याचा वाईटावर विजय पाहून एक प्रकारचे बळ मिळते. आजच्या विज्ञाननिष्ठ काळात का बरं यांचे तत्वज्ञान धीर देतं? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत.

या प्रसंगी स्वामींचे पात्र केलेले अक्षय मुडावदकर, चौळप्पाचे स्वानंद बर्वे, चंदा विजया आनंद बाबर, राधिका निता पेंडसे, लेखक शिरिष लाटकर, दिग्दर्शक निशांत सुर्वे यांनी गुरूपोर्णिमेनिमित्त तीर्थ क्षेत्र अक्कलकोट येथील पत्रकारांशी मालिकेने घेतलेल्या गरूड झेपेबद्दल गुरूवारचे औचित्य साधून संवाद साधताना त्यांनी मालिका तयार करताना आलेला अनुभव, स्वामींच्या लिला, अन् मालिका पूर्ण झाल्यानंतर श्री क्षेत्र अक्कलकोटला जावून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी अतुरता याबाबत संवाद साधून, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्थपणे उत्तरे त्यांनी दिली.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे पालखी परिक्रमा सहाय्यक संयोजक श्रीकांत झिपरे यांनी अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी न्यासाच्या माध्यमातून स्वामीं भक्तांकरिता सुरू केलेली महाप्रसाद सेवा या धार्मिक कार्या बरोबरच सामाजिक, शैक्षणिक, संस्कृतिक, क्रीडा यासह कोव्हिड-19 च्या काळात केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देऊन कलाकारांना भोसले कुटूबिंयाकडून शुभेच्छा दिल्या. कलाकारांनी विविध वृतपत्र प्रतिनिधींबरोबर साधलेल्या संवादबद्दल समाधान व्यक्त केले.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!