• Solapur
  • April 20, 2021
0 Comments

दि.8 : अँटी करप्शन ब्युरोने (Anti Corruption Bureau) तहसीलदार व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर असा आरोप ठेवण्यात आला आहे की, त्याने लाच म्हणून घेतलेली पाच लाखाची रक्कम जाळून टाकली आहे. या तहसीलदाराने क्रशिंग यूनिटला परवानगी देण्याासाठी ही लाच घेतल्याचा आरोप केला जात आहे.

राजस्थानमध्ये (Rajasthan) देखील काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. त्यात एका महसूल अधिकाऱ्याने पुरावा नष्ट करून त्याठिकाणाहून पळ काढण्याच्या प्रयत्नात गॅस स्टोव्हवर 20 लाख रुपयांची होळी केली होती. आता ही आणखी एक घटना तेलंगणाच्या नगरकर्नूल जिल्ह्यात घडली आहे. तहसीलदारापर्यंत लाच पोहोचवणाऱ्या मध्यस्थाने पकडले जाण्याच्या भीतीने हा पराक्रम केला आहे.

एसीबीचे (ACB) डीएसपी श्रीकृष्ण गौड यांनी सांगितले की, नगरकर्नूल जिल्ह्यातील वेलदंड मंडळाचे तहसीलदार सैदुलु यांनी वेंकटय्या गौडला क्रशिंग युनिटसाठी परवाना देण्यासाठी स्थानिक व्यक्तीकडून पाच लाख रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. जेव्हा एसीबीचे अधिकारी सापळा रचून त्याच्यापर्यंत पोहोचले तेव्हा त्याने ती रक्कम जाळली. एसीबीने ही रक्कम जप्त केली तेव्हा त्यातील 70 टक्के नोटा जळाल्या होत्या. मात्र, एसीबीच्या अधिका्यांनी त्याला रंगेहाथ पकडले आणि जळालेला पैसा जप्त केला.

या तहसीलदाराच्या भ्रष्टाचाराला अनेकजण आधीपासूनच वैतागले होते. ज्यावेळी या गुन्हेगारांना नेण्यात आले तेव्हा स्थानिकांनी आनंद व्यक्त केला. तहसीलदाराच्या भ्रष्टाचाराचा सामना करत असलेल्या काहींनी तर फटाके फोडून त्यांचा आनंद व्यक्त केला.

रंगा रेड्डी जिल्ह्यातील तळकोंडपल्ली मंडळाच्या कोरेन्टाकुंठा थांडाचे रामावत रामुलू सरपंच यांनी वेलदंडा मंडळाच्या बोलमपल्ली याठिकाणी क्रशिंग युनिटसाठी ऑनलाईन परवाना मिळावा याकरता अर्ज केला होता. त्यांनी 18 मार्च रोजी संबंधित खाण अधिकाऱ्यांना संबंधित कागदपत्रे सादर केली होती आणि त्यांनी 25 मार्च रोजी महसूल अधिकाऱ्यांना हे प्रकरण घेण्यास सांगितले. जेव्हा सरपंच यांनी परवानगी मागितली तेव्हा सैदूलू या तहसीलदारांनी त्यांच्याकडे सहा लाखांची मागणी केली. सर्व्हेनंतरच्या NOC साठी त्यांनी ही रक्कम मागितली. अखेरीस त्यांनी 5 लाखांवर हे काम करण्याची तयारी दाखवली. त्यांनी त्यांचा साथीदार वेंकटय्या गौडला ही रक्कम सुपूर्द करण्यास सांगितले.

पीडित व्यक्तीने 1 एप्रिल रोजी महाबब नगर (Mahabub) याठिकाणी एसीबीला याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी या तहसीलदाराच्या साथीदाराला पकडण्यासाठी सापळा रचला. आपली चोरी पकडली गेल्याचा संशय गौड याला आला. पोलिसांच्या सापळ्यात तो अडकल्याचे वाटून त्याने स्वत:ला घरात कोंडून घेतले आणि ती सगळी रक्कम गॅसवर पेटवली. जेव्हा एसीबीच्या टीमने त्याच्या मुसक्या आवळल्या तेव्हा त्या नोटा 70 टक्के जळाल्या होत्या. जप्त केलेल्या नोटा 500 रुपयांच्या आहेत.

यानंतर एसीबीने सैदूलू या तहसीलदाराच्या आणि गौड यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी छापेमारी केली. श्रीकृष्ण गौड यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, सैदुलू यांच्याकडे त्यांना बेकायदेशीर मालमत्ता आढळली आहे. सैदुलू आणि व्यंकय्या गौडवर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *