
सोलापूर शहरात रात्र संचार बंदीबाबत महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढला आदेश
Regarding night curfew in Solapur city, Order issued by Municipal Commissioner P. Shivshankar
सोलापूर,दि.२२ : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी काल बैठक घेतली होती. राज्यात आजपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून 5 जानेवारीपर्यंत ते लागू राहील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.
त्याअनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी संचार बंदी संदर्भात आदेश काढला आहे. कोरोनाविषयक उपाययोजना संदर्भात लॉकडाऊन बाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याअनुषंगाने सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, यांनी महानगरपालिका भारतीय साथ रोग अधिनियमानुसार प्राप्त झालेल्या अधिकारान्वये खालीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.
सोलापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी खालील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये दि.२२ डिसेंबर २०२० ते दि .०५ जानेवारी २०२१ या कालावधीमध्ये रात्र संचारबंदी ( रात्री ११.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत ) लागू राहील . तसेच रात्र संचारबंदीबाबत यानंतर काही मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेत आल्यास त्याचे पालन करण्यात यावे. कोविड विषाणूंचा प्रार्दुभाव कमी होण्यासाठी सदरची रात्र संचारबंदी लागू करण्यात येत आहे. रात्र संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच आस्थापना रात्री 11 नंतर सुरु राहणार नाहीत. नागरिकांनी रात्री 11 पूर्वी घरी जाणे अपेक्षित आहे. या काळात दिवसा घराबाहेर पडणाऱ्यांचीही तपासणी केली जाणार आहे. विनाकारण तथा नियमांचे उल्लंघन करीत शहरात इतरत्र फिरणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
यापूर्वी निर्गमित करणेत आलेल्या सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड – १९ च्या प्रतिबंधक सर्व उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणेत यावे. असे महापालिका आयुक्त यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.