
नियमावली तयार करुन दिवाळीनंतर मंदिरं उघडणार : मुख्यमंत्री ठाकरे
दि.8 : आपण सर्व सण साधेपणाने साजरे केले. सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. नागरिकांच्या सहकार्यामुळे आज आपण थोडेसे तणावमुक्त आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमिवर गर्दी वाढत आहे. …
दि.8 : आपण सर्व सण साधेपणाने साजरे केले. सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. नागरिकांच्या सहकार्यामुळे आज आपण थोडेसे तणावमुक्त आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमिवर गर्दी वाढत आहे. सगळे व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. राज्यात सगळीकडे कोरोना कमी होत चालला आहे. मात्र आपण काळजी घेणं गरजेचं आहे. दिवाळीमध्ये काळजी घेणं गरजेचे आहे. दिवाळीत फटाक्यांवर बंदी आणण्यापेक्षा आपणच त्यावर उपाय करणं गरजेचं आहे, असं ठाकरे म्हणाले. आज त्यांनी फेसबुकवरुन राज्यातील नागरिकांना संबोधित केलं.
‘हवेमुळे कोरोनाचा विषाणू वाढत आहे. प्रदूषण टाळण्यासाठी फटाकेवर बंदी आणता येईल. पण, फटाकेवर बंदी (Firecrackers ban) घालण्यापेक्षा तुम्हीच जबाबदारी घ्यावी, फटाके न फोडण्याचा जनतेनं संकल्प करावा आणि प्रदूषण टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्याचे टाळावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मंदिरं कधी उघडणार? प्रार्थनास्थळं कधी उघडणार असा सवाल केला जात आहे. मंदिरं सुरु करताना पूर्ण काळजी घेतली जाईल. दिवाळीनंतर नियमावली करुन मंदिरं उघडणार असल्याचे ठाकरे म्हणाले. मंदिरावरुन माझ्यावर टीका केली जाते. मात्र राज्यातील लोकांसाठी आपण मंदिरं उघडायला उशीर करत आहोत. मात्र लवकरच नियमांसह मंदिरं उघडली जातील असं ठाकरे म्हणाले.
राज्यात आता उद्योग धंदे हे पूर्वपदावर येत आहे. सर्वत्र गर्दी ही वाढत चालली आहे. सर्व व्यवहार हे पूर्वपदावर येत आहे. पण, खबरदारी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या काळात आपल्याकडून परिस्थिती ही अनियंत्रित होत असल्याची टीका झाली. पण, सर्वांनी धैर्याने सामना केला आणि आता त्याचा आलेख हा कमी झाला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मंदिर कधी उघडणार? असा सवाल करत माझ्यावर टीका होतेय, करू द्या. तुमच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी टीका सहन करायला मी तयार आहे. टीका करणारे 4 दिवस करतील परंतु उद्या गंडांतर आलं तर? माझ्यावर जबाबदारी आहे, असं ठाकरे म्हणाले. ठाकरे म्हणाले की, मंदिर उघडणारच आहोत… परंतु त्यासाठी नियमवली बनवत आहोत. मंदिरात साधारण ज्येष्ठ नागरिक जातात, त्यांनाच तर आपण वाचवत आलो आहोत. प्रत्येक धर्मस्थळात आपण तल्लीन होऊन प्रार्थना करतो, परंतु त्यामुळे संक्रमण वाढायला नको, असं ठाकरे म्हणाले.
‘गेल्या सात महिन्यांपासून लढा देऊन परिस्थिती आटोक्यात आली आहे. त्यामुळे चार दिवसांच्या धुरात हे वाहून जाता कामा नये, प्रदूषण टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्याचे टाळा, शक्यतो फटाके फोडूच नये. फटाके फोडले नाही तर उत्तमच आहे. दिवाळीतील चार महिने हे अत्यंत महत्त्वाचे आहे. फटाकेवर बंदी आणली जाणार नाही. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेऊन फटाके फोडू नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “ब्रिटन, इटली, स्पेनमध्ये पुन्हा लॉकडाउन लागू झाला आहे. नेदरलॅण्डमध्ये घरातल्या घरात मास्क सक्ती केली आहे. याकडे जर बघितलं, तर मी म्हणेन ही लाट नाही, तर त्सुनामी आहे. आपल्याला हे होऊ द्यायचं नाही. डॉक्टर, पोलीस लढतायेत. ते कुणासाठी लढतायेत,” असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.
“कोरोनाविरोधात लढताना आपल्याकडे मास्कशिवाय दुसरं कुठलंही शस्त्र नाही. शंभर वर्षांपूर्वी आलेल्या स्पॅनिश फ्लूनं एक कोटी लोक मरण पावली होती. आता लोकसंख्या किती आहे, त्याच प्रमाण काय होईल? मी घाबरवत नाहीये, पण सर्तक राहण्यासाठी सूचना देतोय. जरी आपण सगळ्या गोष्टी उघडत आहोत. कारण आयुष्य पूर्वपदावर आलंच पाहिजे. अर्थचक्राला गती देतो आहोत. पण गती देताना वेडीवाकडी गती देण्याचा प्रयत्न केला, तर ते दुर्गती होईल. गतीच्याऐवजी अधोगती होईल. पुन्हा जर का लॉकडाउन करण्याची वेळ आली तर तो आपल्याला भारी पडेल. रुग्णसंख्या वाढली आहे. सुविधा वाढल्या आहेत. पण त्याला मर्यादा आहेत. सरकारनं बेड वाढवले, पण फक्त बेड वाढवून होणार नाहीत. कारण डॉक्टर आणि आरोग्यसेवक आणायचे कुठून? उद्या जर दुप्पट तिप्पट लाट आली, तर त्रैधातिरिपीट उडू शकते. ती येऊ न देणं हे आपण करू शकता,” असं ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मास्क घातला नाही तर दंड करावाच लागणार. एक कोरोना रुग्ण गर्दीत फिरला मास्क न लावता तर 400 लोकांना संक्रमित करू शकतो. ते पुढे किती करतील, याचा विचार करा. हे मी डॉक्टरांशी, तज्ज्ञांशी बोलुन सांगत आहे. त्यामुळे मास्क अनिवार्यच आहे. 60000 लोकांनी अहोरात्र, स्वत:च्या जीवाची मेहनत केलीत. त्यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम राबवली, म्हणून कोरोना नियंत्रणात आला. मी त्यांचा ऋणी आहे. त्यांना मन:पूर्वक धन्यवाद. कोरोना योद्ध्यांना सलाम!, असं ते म्हणाले.