सोलापूर,दि.२५ : सोलापूर शहरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक आहे. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सुधारित आदेश काढले आहेत.
१ ) सोलापूर शहरातील सर्व दुकाने ०७.०० वा . ते संध्याकाळी ०७.०० वा. या कालावधीत चालू राहतील तथापी , हे निबंध अत्यावश्यक सेवा / मनुष्य व प्राणी मात्रासाठी जीवनाश्यक वस्तू , भाजीपाला, फळे, किराणा, दुध व वृत्तपत्रे वितरण याबाबींना लागू राहणार नाही. प्रत्येक दुकानदारांनी कोव्हिड -१९ चे मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक राहील . शहरातील दुकानदारांनी दहा दिवसात रॅपिड अँन्टीजन टेस्ट / RTPCR किंवा स्वतःचे लसीकरण केलेबाबतची माहिती आपल्या दुकानात लावणे बंधनकारक असेल.
२ ) प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने पुर्णपणे बंद राहतील. हे निबंध अत्यावश्यक सेवा / मनुष्य व प्राणी मात्रासाठी जीवनाश्यक वस्तू, भाजीपाला, फळे, किराणा, दुध व वृत्तपत्रे वितरण याबाबींना लागू राहणार नाही.
३ ) सोलापूर शहरातील सर्व आठवडे बाजार जनावरांचा बाजार बंद करण्यात येत आहे.
४ ) शहरातील हॉटेल / खाद्यगृहे, चौपाटी, परमिट रुम बार फक्त सकाळी ०७.०० ते संध्याकाळी ०८.०० या कालावधीत कोव्हिड -१९ चे मार्गदर्शक तत्वांचे यथोचित पालन करुन ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. होम डिलीव्हरी चे किचन / वितरण कक्ष रात्री १०.०० वा . पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.
५ ) शहरातील जीम, व्यायामशाळा, स्पोर्टस कॉम्लेक्स, खेळाची मैदाने, जलतरण तलाव हे वैयक्तिक सरावासाठी सुरु राहतील अन्यथा इतर कारणांसाठी उपरोक्त सेवा बंद राहतील. तसेच सामुहिक स्पर्धा / कार्यक्रम बंद राहतील.
६ ) शहरातील वॉटर पार्क तत्सम मनोरंजनाची ठिकाणे सकाळी ०७.०० ते संध्याकाळी ०७.०० वाजेपर्यंत सुरु राहतील. यातील प्रवेश एका वेळी ५० व्यक्तींनाच दिला जाईल. एकावेळी वॉटरपार्कमध्ये ५० व्यक्ती राहतील. रोटेशन पध्दतीने व्यक्तींना प्रवेश द्यावा व बाहेर पडणाऱ्या व्यक्तीच्या बदल्यात तेवढयाच व्यक्ती आत सोडाव्यात. कोरोना विषयक शासन आदेश व सूचनांचे तंतोतंत पालन करुनच या ठिकाणी प्रवेश देण्यात यावा. याचा भंग केल्यास यापूर्वी आदेश केलेप्रमाणे दंडाची कारवाई करणेत यावी.
७ ) शहरातील सर्व प्रकारची धार्मिक स्थळे सकाळी ०७.०० ते संध्याकाळी ०७.०० वा. या वेळेत सुरु राहतील. धार्मिक विधीमध्ये पाच व्यक्तीपेक्षा जास्त उपस्थिती राहणार नाहीत.
८ ) शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये लिलावासाठी येणाऱ्या कृषी मालाच्या प्रकारानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीने नियोजन करुन एका दिवशी व एकाच दिवशी व एकाच वेळी लिलाव न करता मालाच्या प्रकारानुसार लिलावाचे दिवस व वेळा विभागून द्याव्यात व त्याचे नियोजन संबंधीत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर यांनी करावे. तसेच बाजार समिती मध्ये येणाऱ्या मालाची त्या ठिकाणी किरकोळ विक्री करण्यास प्रतिबंध असेल.
९ ) शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये ( Containment Zone ) सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना, धार्मिक स्थळे प्रार्थना स्थळे, कार्यालये, बंद ठेवण्यात यावीत.
१० ) सर्व संबंधीत विभागांनी कोरोना जनजागृती सप्ताह सुरु करुन जास्तीत जास्त प्रचार प्रसिध्दी करुन नागरिकांमध्ये कोव्हिड -१९ बाबतचे मार्गदर्शक सुचनांचे पालन करणेबाबत जनजागृती करावी.
११ ) तसेच कोव्हिड -१९ बाबतीत शासनाच्या मार्गदर्शक सूचना जसे मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे, हेन्ड सॅनिटायझरचा वापर इ. बंधनकारक राहील.
१२ ) सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड -१९ च्या पुनश्च होऊ लागलेल्या मोठ्या प्रमाणावरील प्रार्दुभाव या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी दिनांक २८/०३/२०२१ रोजी साजरा होणारा होळी सण व दिनांक २ ९ / ०३ / २०२१ रोजीचा धुलिवंदन किंवा रंगपंचमी सण / उत्सव सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थामधील मोकळ्या जागा, रस्ते, मैदाने, गार्डन, शाळा इ. ठिकाणी व सार्वजनिकरित्या साजरा करण्यास प्रतिबंध करणेत येत आहे.
१३ ) यावर्षी शब – ए – बारात उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. कोविड -१९ संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता २८ मार्च २०२१ रोजीची रात्र व दिनांक २९ मार्च २०२१ रोजीची पहाट या कालावधीत ( चंद्रदर्शनावर अवलंबून ) येणाऱ्या शब – ए – बारात उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे मिरवणूकांचे आयोजन करु नये. मशिदीत अथवा घरातच दुवापठण करावे त्याअनुषंगाने स्थानिक लोकप्रतिनिधी व विभाग अधिकारी, स्थानिक पोलीस अधिकारी यांनी जनजागृती करावी. शब – ए – बारात निमित्त स्थानिक मशिदीत नमाज पठणाकरिता येणाऱ्या मुस्लिम बांधवांनी कोणत्याही प्रकारची गर्दी न करता एका वेळी ४० ते ५० व्यक्तींनी टण्या – टप्याने सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन व मास्कचा वापर करुन दुवा पठण करावे. मशिदीतील व्यवस्थापक यांनी मशिद व आजूबाजुच्या परिसरात निर्जुतूकीकरणाची व्यवस्था, सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेचे नियम ( मास्क, सॅनीटायझर इ. ) चे पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. शब – ए – बारात दरम्यान इतर कोणतेही सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम आयोजित करु नयेत . शब – ए – बारातच्या अनुषंगाने वाझ कार्यक्रमाचे सार्वजनिक आयोजन करु नये. तसेच असे कार्यक्रम आयोजित करावयाचे असल्यास आयोजकांनी कार्यक्रमाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन द्यावी. संचारबंदीच्या वेळेत कोणतेही कार्यक्रम आयोजन करणेस बंदी असेल.