क्रूरतेचा कळस गाठणारी घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर वयाच्या 12 वर्षी बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) शाहजहांपूरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये एका महिलेने 26 वर्षानंतर दोन सख्या भावांवर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. बलात्कारानंतर महिलेने एका मुलाला जन्म दिला होता. त्या महिलेच्या म्हणण्यानुसार जेव्हा मुलगा मोठा झाल्यावर प्रश्न विचारू लागला तेव्हा न्याय मिळण्यासाठी तिने कायद्याचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला.
या महिलेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ती 12 वर्षांची होती तेव्हा तिच्याबरोबर हे सर्व घडले. यानंतर तिने एका मुलालाही जन्म दिला. मग बदनामी होण्याच्या भीतीने, हे मूल एका जोडप्यास संभाळण्यासाठी दिले गेले होते. शेवटी कसं तरी हे रहस्य समोर आलं. या महिलेच्या म्हणण्यानुसार जेव्हा मुलगा मोठा झाल्यावर प्रश्न विचारू लागला तेव्हा न्याय मिळण्यासाठी तिने कायद्याचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला.
महिलेच्या आरोपानुसार, जेव्हा ती 12 वर्षांची होती आणि तिच्या बहीण-भाऊजीच्या घरी राहत होती, तेव्हा शेजारी राहणाऱ्या दोन भावांनी तिला घरात एकटे पाहून एक दिवस तिच्यावर बलात्कार केला. यानंतरही त्याने तिला धमकावून लैंगिक छळ सुरूच ठेवले. जेव्हा ती गर्भवती झाली, तेव्हा डॉक्टरांनी गर्भपात करण्यास नकार दिला कारण ती खूपच लहान होती. त्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी मुलाला एका जोडप्याकडे संभाळण्यासाठी दिले.
पोलिस तपास सुरू, आरोपींची डीएनए चाचणी केली जाणार
या महिलेचे चार-पाच वर्षानंतर लग्न झाले. या महिलेला आणखी एक मुलगा झाला. पण लग्नाच्या काही वर्षानंतरच महिलेला लग्नाच्या अगोदर मुलगा झाल्याचे रहस्य तिच्या पतीसमोर उघड झाले. त्यानंतर पतीने तिला सोडून दिले. त्या महिलेच्या मुलाला दत्तक घेणाऱ्या जोडप्यानेही मुलगा महिलेला परत केला. मोठा मुलगा आता 24 वर्षांचा आणि लहान मुलगा 19 वर्षांचा आहे. मोठ्या मुलाने दहावीनंतर शिक्षण सोडले. त्याच वेळी, छोट्याने इंटरमीडिएट केले आहे. आता ही महिला लखनौमध्ये राहते.
जेंव्हा मुलगा मोठा झाला व त्याला समजले की तो अविवाहित आईचा मुलगा आहे आणि त्याच्या आईवर अत्त्याचार झाल्याचे कळले तेंव्हा मुलगा आईवर अत्त्याचार करणाऱ्यांची नावे विचारू लागला. त्याच्या आईवर अत्त्याचार झाल्याचे कळल्यावर तो अस्वस्थ झाला.
मुलाच्या वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमुळे शेवटी पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल करण्याचे ठरवले. घटना 26 वर्षापूर्वी घडली असल्याने पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. परंतु मुलगा न्याय मिळवण्यासाठी आग्रही होता. मुलाने आत्महत्त्या करण्याची धमकी दिल्याने पीडित महिलेने शेवटी न्यायालयात धाव घेतली. कोर्टाच्या आदेशानंतर आता 26 वर्षांनंतर पोलिसांनी बलात्काराचा हा गुन्हा दाखल केला आहे.
मुलाच्या न्यायासाठी लढाई सुरू
या महिलेचे म्हणणे आहे की तिला आशा आहे की तिला आणि मुलाला न्याय मिळेल. शाहजहांपूर एसपी सिटी संजय कुमार म्हणतात की, “न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि नियमांनुसार चौकशी केली जात आहे, आरोपींची डीएनए चाचणी केली जाईल.” पुराव्यांच्या आधारे कारवाई केली जाईल.