
चार लाखांच्या कर्जासाठी आठ लाख रुपयांचा गंडा
सोलापूर,दि.१२ : कर्जाचे आमिष दाखवून व्यंकटेश पांडुरंग सामल ( वय २६, रा. चिप्पा मार्केटजवळ, युनिक होम ) या तरुणाची फसवणूक केली. चार लाखांचे कर्ज देण्यासाठी आरोपींनी आठ लाखांपेक्षा जास्त रक्कम लाटली. …
मुंबई,दि.19 : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने भर दिला असून …
सोलापूर,दि.१९ : सोलापूर शहर नवीन ४३६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २१९८२ झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या १७५३४ झाली आहे.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३५२९ आहे.तर आजपर्यंत मृतांची …
मुंबई,दि.19 : कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी …
दि.19 : देशातील कोरोना विषाणूचे संकट वेगाने वाढत आहे आणि दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या विविध भागात बेड, ऑक्सिजनची कमतरता असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, कोरोना संकटाबाबत आता …
सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 709 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 59019 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 50293 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 7311 आहे.तर …
सोलापूर,दि.19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव …
दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या …
मुंबई,दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे …
दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात …
दि.१९ : पॉइंटमन भारतीय रेल्वेत म्हणून कार्यरत असलेल्या मयूर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत चिमुकल्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. शेळके …
सोलापूर,दि.१२ : कर्जाचे आमिष दाखवून व्यंकटेश पांडुरंग सामल ( वय २६, रा. चिप्पा मार्केटजवळ, युनिक होम ) या तरुणाची फसवणूक केली. चार लाखांचे कर्ज देण्यासाठी आरोपींनी आठ लाखांपेक्षा जास्त रक्कम लाटली. …
सोलापूर,दि.१२ : कर्जाचे आमिष दाखवून व्यंकटेश पांडुरंग सामल ( वय २६, रा. चिप्पा मार्केटजवळ, युनिक होम ) या तरुणाची फसवणूक केली. चार लाखांचे कर्ज देण्यासाठी आरोपींनी आठ लाखांपेक्षा जास्त रक्कम लाटली. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० दरम्यान हा प्रकार घडला.
याप्रकरणी आनंद अगरवाल, प्राची देसाई व मिलिंद महाजन यांच्याविरुध्द जेलरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये एका फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून आरोपी आनंदने फोन केला. त्याने बिगरव्याजाने चार लाखांपर्यंत कर्ज मिळेल असे फिर्यादीला सांगितले.
पण पहिला हप्ता भरल्यानंतरच कर्जाची रक्कम बँक खात्यात जमा होणार असेही आरोपीने फिर्यादीला सांगितले. त्यानंतर फिर्यादीला आरोपी प्राची आणि मिलिंद यांनी फोन केला. त्यांनी प्रकरणासाठीचा खर्च सांगून वेळोवेळी पैशाची मागणी केली. त्याप्रमाणे व्यंकटेश यांनी आरोपीच्या बँक खात्यात ८ लाख ३५ हजार ७०० रुपये भरले. परंतु फिर्यादीला कर्ज न देता आरोपींनी त्यांची फसवणूक केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बादोले हे करीत आहेत.
सोलापूर,दि.११ : घरबसल्या जादा पैसे मिळवा, अशी जाहिरात करुन व मोबाइल कंपनीत नोकरीस लावतो, असे सांगून तिघांनी फोन पे व गुगल पे वरून वेळोवेळी ३ लाख २० हजार ८०० रुपये मागवून …
सोलापूर,दि.११ : घरबसल्या जादा पैसे मिळवा, अशी जाहिरात करुन व मोबाइल कंपनीत नोकरीस लावतो, असे सांगून तिघांनी फोन पे व गुगल पे वरून वेळोवेळी ३ लाख २० हजार ८०० रुपये मागवून घेऊन रानमसले येथील एका २८ वर्षीय शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयमध्ये गोपनीय रिपोर्टर असल्याची बतावणी करणाऱ्या लातूर येथील एक व लांबोटी येथील दोघे अशा तिघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथील आकाश अर्जुन शिंदे यांची शिरापूर येथे लातूर येथील सागर आगलावे याच्याशी ओळख झाली. त्यावेळी सागर याने आकाश यास मी सीबीआयमध्ये रिपोर्टर असून गोपनीय कामानिमित्त येथे आलो आहे, असे सांगत एका मोबाइल कंपनीमध्ये घरबसल्या जादा पैसे कमवा अशी जाहिरात केली. तसेच कंपनीमध्ये काम लावतो, असे सांगून सागर व त्याचे लांबोटी येथील दोन मित्र अजय विष्णू पाटील व सचिन लवटे या तिघांनी ३१ डिसेंबर २०१९ ते ४ नोव्हेंबर २०२० या कालावधीमध्ये वेळोवेळी आकाश यांच्या फोन पे व गुगल पे या दोन्ही अकाउंटवरून एकूण ३ लाख २० हजार ८०० रुपये इतकी रक्कम मागवून घेतली.
दरम्यान, कुरिअरद्वारे लॅपटॉप येईल, तू काळजी करू नको असे सांगितले. परंतु वारंवार त्यांच्याकडे चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने आकाश यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात त्या तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस हवालदार राठोड हे करीत आहेत.
अंबरनाथ,दि.10 : नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार अनेकवेळा घडतात. नोकरीच्या आमिषाने अनेकजण लाखो रुपये देतात. नोकरीची गरज ओळखूनच फसवणूक करणाऱ्यांचे धाडस वाढत आहे. नोकरी देण्याच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करणाऱ्यांच्या टोळीचं पितळ पुन्हा …
अंबरनाथ,दि.10 : नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार अनेकवेळा घडतात. नोकरीच्या आमिषाने अनेकजण लाखो रुपये देतात. नोकरीची गरज ओळखूनच फसवणूक करणाऱ्यांचे धाडस वाढत आहे. नोकरी देण्याच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करणाऱ्यांच्या टोळीचं पितळ पुन्हा एकदा उघडं पडलं आहे. रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार अंबरनाथ पोलिसांनी उघड केला आहे. (Fraud of lakhs of rupees in the name of giving jobs to the youth in the railways) याप्रकरणी आयआरसीटीसीच्या एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कैलास राजपाल सिंह अस या भामट्याच नाव आहे.
बदलापूरला राहणारा कुमार चव्हाण हा नोकरीच्या शोधात असतानाच त्याला कैलास राजपाल सिंग या भामट्याने रेल्वेत नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवलं. कैलास आयआरसीटीसीच्या चर्चगेट स्टेशनवरील कँटीनमध्ये काम करत होता.
खोटी परीक्षा, खोटी मुलाखत घेऊन पास होण्यासाठी 5 लाख रुपये त्याने कुमार चव्हाण याच्याकडून उकळले. आपली अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचं सांगून त्याने त्याला खोटं नियुक्तीपत्रही दिलं. मात्र हा सगळा प्रकार खोटा असून आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच कुमार याने पोलिसात धाव घेतली.
अंबरनाथ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. कैलाश दर एक ते दोन महिन्यांनी राहण्याचा ठावठिकाणा बदलत होता. अखेरीस विरारहून त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. यानंतर या संपूर्ण प्रकरणात रेल्वेचे दोन अधिकारीसुद्धा सहभागी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. कैलास सिंह हा या अधिकाऱ्यांना नवी गिऱ्हाईकं शोधून द्यायचा, तर हे अधिकारी बनावट लेटरहेड आणि शिक्के वापरुन फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे. पोलीस आता या दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहेत. अशाच पद्धतीनं या त्रिकुटाने अनेकांना गंडा घातल्याची शक्यता असून त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.
दि.8 : फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अनेकजण व्हॉट्सॲपवर (Whatsapp) येणाऱ्या लिंकवर क्लीक करतात व पुढे फॉरवर्डही करतात. सहसा कुठलेही कंपनी सोशल मीडियाद्वारे लिंक पाठवून ऑफर देत नाहीत. सध्या अनेक कंपन्या महिलांसाठी …
दि.8 : फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अनेकजण व्हॉट्सॲपवर (Whatsapp) येणाऱ्या लिंकवर क्लीक करतात व पुढे फॉरवर्डही करतात. सहसा कुठलेही कंपनी सोशल मीडियाद्वारे लिंक पाठवून ऑफर देत नाहीत. सध्या अनेक कंपन्या महिलांसाठी आकर्षक ऑफर देत आहेत. (Fake Link Viral On WhatsApp). पण, या ऑफर्सच्या चक्करमध्ये तुमची फसवणूकही होऊ शकते. WhatsApp वर मेसेजच्या माध्यमातून ऑफरचा लोभ देऊन महिलांच्या फसवणुकीचे अनेक प्रयत्न होत आहेत. WhatsApp वर एक मेसेज सर्क्युलेट होत आहे. यामध्ये दावा करण्यात आला आहे की, महिला दिनाला मोफत शूज दिले जातील आणि तेही एका मोठ्या ब्रांडचे.
जर तुम्हालाही अशा प्रकारचा कुठला मेसेज आला असेल तर याला लगेच डिलीट करा. कारण, हा एक फेक मेसेज आहे. याच्या माध्यमातून तुमच्या खात्यातील पैसे लुटले जाऊ शकतात. तसेच, तुमची खाजगी माहितीही याद्वारे हॅक केली जाऊ शकते.
याप्रकारची लिंक येत आहे WhatsApp वर दररोज हजारो मेसेज फॉरवर्ड केले जातात आणि काही लोक यावर विश्वासही ठेवतात. कुठल्या अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने अनेकदा युझरची फसवणूक होते. जागतिक महिला दिवसाला WhatsApp वर जो मेसेज पाठवला जात आहे त्यामध्ये दावा केला जात आहे की जोड्यांची मोठी कंपनी महिला दिवसावर महिलांना मोफतमध्ये शूज देत आहे. त्यामध्ये एक लिंकही आहे. याप्रकराची ती लिंक आहे – https://v-app.buzz/adidass/tb.php?_t=161492973315:35:33”. जर तुमच्याकडेही ही लिंक आली असेल तर लगेच ही लिंक डिलीट करा. या लिंकच्या माध्यमातून तुमची पर्सनल डिटेल चोरली जाऊ शकतात.
वेबसाईटवर कुठलाही ऑफर नाही
एडिडासच्या वेबसाईटवर अशा प्रकारची कुठलीही ऑफर नाही. जर कंपनी असा कुठला ऑफर युझर्सला देते तर ती आपल्या अधिकृत वेबसाईटवरही अपडेट करेल. अनेक कंपन्या आपल्या आधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरही याबाबत माहिती देतात. सोबतच लोकांना पाठवण्यात येणारी लिंकही संशयास्पद आहे. यूआरएलला अशा प्रकारे आहे – v-app.buzz/adidass.
यामध्ये एडिडासची स्पेलिंग चुकीची आहे. याचं स्पेलिंग Adidas आहे. कंपनीच्या वेबसाईटचं यूआरएल https://shop.adidas.co.in/ आहे. सोबतच या मेसेजमध्ये जो लोगो देण्यात आला आहे तो Adidas चा नाहीये. त्यामुळे तुम्ही या लिंकवर विश्वास नाही ठेवू शकत.
सोलापूर,दि.२४ : भूम तालुक्यातील शेतकऱ्याची तूर लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी बार्शीतील व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी दिली होती. मात्र, कोणताही माल ठेवला नसल्याचे सांगत २५ टन ७९५ किलो वजनाची अंदाजे १८ लाख ७५ हजार रुपयांची …
सोलापूर,दि.२४ : भूम तालुक्यातील शेतकऱ्याची तूर लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी बार्शीतील व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी दिली होती. मात्र, कोणताही माल ठेवला नसल्याचे सांगत २५ टन ७९५ किलो वजनाची अंदाजे १८ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक बार्शीतील व्यापाऱ्यांनी केली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी नरहरी साहेबराव अंधारे ( वय ७८, रा. माणकेश्वर ) यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीनुसार अंधारे यांनी २५ टन ७९५ किलो इतकी तूर बार्शीतील पंडित जवाहरलाल नेहरु मार्केट यार्डातील ओळखीचे व्यापारी किरण शिराळ या अडत व्यापाऱ्याकडे १० व १९ फेब्रुवारी २०२० रोजी विक्रीसाठी ठेवली होती. तूर दिली त्यावेळी ४५०० ते ४७०० रुपये इतका तुरीला भाव होता. तुरीला ७५०० रुपये भाव येईपर्यंत विकायची नाही, असे फिर्यादीने संबंधित व्यापाऱ्याला सांगितले होते. त्यावेळी शिराळ यांनी सांगितले की , तुरीला एवढा भाव येण्यास पाच ते सात महिने लागतील.
यानंतर शिराळ यांनी संतोष बागमार यांच्या भोयरे येथील वेअर हाऊसला तुरी ठेवल्या. याची पावती मागितली असता पावती बुक संपल्याचे फिर्यादीस सांगण्यात आले. एक आठवड्याने फिर्यादी बागमार यांच्याकडे पावती मागण्यास गेले असता शिराळ यांच्याकडे पावती दिली असल्याचे ते म्हणाले.
यानंतर लॉकडाउन लागले. लॉकडाउन संपल्यानंतर पावती मागण्यासाठी फिर्यादी पुन्हा शिराळ यांच्याकडे गेले, तेव्हा शिराळ म्हणाले काळजी करू नका तुमची पावती सुरक्षित आहे. २५ सप्टेंबर २०२० रोजी शिराळ यांच्याकडे फिर्यादी गेले. मात्र, त्यांचे अडत दुकान बंद होते. यानंतर बागमार यांच्याकडे ठेवलेल्या तुरीचा माल मागण्यासाठी फिर्यादी अंधारे गेले असताना बागमार यांनी नकार दिला.
पुढे किरण शिराळ यांच्या घरी चौकशी करण्यासाठी अंधारे गेले, तेव्हा त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. पुन्हा बागमार यांच्याकडे चौकशीला गेल्यानंतर त्यांनी किरण ट्रेडिंग कंपनीतर्फे आवक व जावकच्या नोंदी गोडाऊन किपरने दाखविल्या. शिराळ यांच्याकडे ठेवलेली तूर परत घेतली नाही व तूर परत घेतल्याबाबत पावतीवर कुठेही सही केलेली नाही. यानंतर नरहरी अंधारे यांनी तालुका पोलिसांत याबाबत फिर्याद दिली.
दि.2 : फेसबुक फ्रेंडशीपच्या (Facebook friendship) माध्यमातून 10 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. नागपूरातील एका 66 वर्षीय वृद्ध व्यक्तीला गंडा घातला आहे. लंडनच्या एक कथित मैत्रिणीने गंडा घातला आहे. …
दि.2 : फेसबुक फ्रेंडशीपच्या (Facebook friendship) माध्यमातून 10 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. नागपूरातील एका 66 वर्षीय वृद्ध व्यक्तीला गंडा घातला आहे. लंडनच्या एक कथित मैत्रिणीने गंडा घातला आहे. कस्टम ड्युटीच्या नावाखाली सेवानिवृत्त वृद्धाचे 10 लाख रुपये या मैत्रिण आणि तिच्या टोळीने लंपास केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.
66 वर्षीय नागपूरमधील वृद्धाची काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर लिडा थॉमसन नावाच्या महिलेशी ओळख झाली होती. आधी चॅटिंग नंतर फोनवर सतत बोलणे होऊ लागले. लिडाने तिचे लंडनमधील अनेक नामांकित ठिकाणांवरचे फोटो दाखवून नागपुरातील या वृद्ध व्यक्तीला भुरळ घातली. लॉकडाऊनच्या काळात अचानक एक दिवशी लिडाने ती भारतात येऊ इच्छिते आणि तिच्याकडील कोट्यवधी रुपयांनी भारतात सेवा कार्य करू इच्छिते असं सांगितले. नागपुरातील या वृद्ध मित्रानेही तिला होकार दिला.
अचानक एकेदिवशी लिडाचा पुन्हा फोन आला आणि ती दिल्ली एयरपोर्टवर अडकली असून तिला कस्टम अधिकाऱ्यांनी थांबवल्याची थाप मारली. तिच्याकडे भारतात सेवा कार्यासाठी आणलेले 2 कोटी रुपये असल्याने तिला कस्टमवाले 10 लाख कस्टम ड्युटी भरल्याशिवाय बाहेर निघू देत नाही आहे, असं लिडाने सांगितले. सोबतच फोनवरून बनावट एयरलाईनचे अधिकारी आणि बनावट कस्टम अधिकारी यांच्याशी बोलणे करून दिले.
आपल्या मैत्रिणीच्या आकर्षणात पुरते अडकलेले वृद्ध या जाळ्यात अडकले आणि त्यांनी 9 लाख 66 हजार रुपए लिडाने सांगितलेल्या बँक खात्यात पाठवले. त्यांनतर लिडा बेपत्ता झाली आणि एयरलाईन व कस्टम अधिकारीही बेपत्ता झाले.
अनेक आठवडे लिडाची वाट पाहिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वृद्ध व्यक्तीने काल बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी लिडा आणि सहकाऱ्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मात्र, आतापर्यंतच्या तपासात वृद्धासोबत बोलणारी महिला कधीच लंडनमधून बोलत नव्हती तर ती दिल्लीतूनच बोलत होती, असं समोर आले आहे. वृद्ध, सेवानिवृत्त, महिला, विद्यार्थी असे घटक या भामट्यांचे टार्गेट असतात, त्यामुळे त्यांनी जास्त सावध राहण्याची गरज असल्याचे पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांनी म्हटलं आहे.
सोलापूर,दि.३१ : जुळे सोलापुरातील दावत चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank Of India) एटीएम सेंटरमध्ये (ATM Center) वृद्धाचे एटीएम कार्ड बदलून भामट्याने दुसऱ्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन वीस हजार रुपये काढून …
सोलापूर,दि.३१ : जुळे सोलापुरातील दावत चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank Of India) एटीएम सेंटरमध्ये (ATM Center) वृद्धाचे एटीएम कार्ड बदलून भामट्याने दुसऱ्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन वीस हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली आहे. याबाबत दामोदर बलभीम पाटील ( वय ८०, रा. राजस्वनगर, विजापूर रस्ता ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी इसमाविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी पाटील हे दावत चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. ते मशीनमध्ये एटीएम कार्ड घालून पैसे काढत असताना त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या अनोळखी इसमाने फिर्यादीस थांबा काका काहीतरी अडचण आहे, मी कार्ड काढून पुन्हा घालतो, असे सांगितले.
त्याने फिर्यादीस बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम कार्ड देऊन त्यांच्याजवळील एटीएम कार्ड घेऊन पोबारा केला. काही वेळानंतर आरोपीने इंचगिरी मठाजवळील आयडीबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमधून फिर्यादीच्या खात्यातील वीस हजार रुपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली. सहायक फौजदार मोरे हे अधिक तपास करीत आहेत.
सायबर पोलिसांनी जनजागृती करावी
गेल्या काही दिवसांपासून शहरात सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. दररोज एटीएम कार्ड बदलणे, पिन नंबर विचारुन ऑनलाइन खरेदी करुन फसवणूक करणे, आदी घटनांमध्ये वाढ होत आहे. याबाबत सायबर क्राईम विभागाने जनजागृतीपर उपक्रम राबवून फसवणुकीच्या घटनांवर आळा घालण्याची मागणी होत आहे.
सोलापूर,दि.३१ : खोट्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे ९० लाख रुपये वर्ग केले तसेच जबरदस्तीने सोन्या – चांदीचे दागिने काढून घेतल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या चौघांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी …
सोलापूर,दि.३१ : खोट्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे ९० लाख रुपये वर्ग केले तसेच जबरदस्तीने सोन्या – चांदीचे दागिने काढून घेतल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या चौघांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. कुर्वे यांनी दिला. याबाबत भंगरेव्वा महादेव बागदुरे ( वय ८१, रा. नरेंद्रनगर, सैफुल ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहाजणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात जबरी चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
यातील राजश्री राजशेखर बागदुरे ( वय ५० ), शारदा विजयकुमार बागदुरे ( वय ४२ ), राकेश ऊर्फ सिद्धेश्वर बागदुरे ( वय ३०, सर्व रा. उत्तर कसबा, बाळीवेस ), शिवानंद ऊर्फ शिवशंकर अंबण्णा नागणसुरे ( वय ३४, रा. शिवगंगानगर, शेळगी ) यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ झाली आहे. तर राजशेखर महादेव बागदुरे व राकेशचा मित्र माशाळ यांना अद्याप अटक झालेली नाही.
आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या उमासा नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीमधील ७० लाख रुपये व जॉइंट खात्यातील २० लाख रुपये फिर्यादीच्या संमतीशिवाय खोट्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दोन्ही सुना राजश्री व शारदा यांच्या नावे ट्रान्सफर करून घेतले तसेच फिर्यादीस मारहाण करून अंगावरील १८ तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले.
त्याचप्रमाणे फिर्यादीच्या उत्तर कसब्यातील छोट्या तिजोरीतील १५० तोळे सोने व ५० तोळे चांदी, इतर मौल्यवान वस्तू तसेच खतावणी व कागदपत्रे फिर्यादीच्या संमतीशिवाय काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील हे अधिक तपास करीत आहेत. यात सरकारतर्फे ॲड. संतोष पाटील, मूळ फिर्यादीतर्फे ॲड. श्रीकृष्ण कालेकर, ॲड. अनिल मुसळे तर आरोपीतर्फे ॲड. रमेश कणबसकर हे काम पाहत आहेत.
सोलापूर,दि.२९ : खोट्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे ९० लाख रुपये वर्ग केले (Transferred Rs 90 lakh on the basis of false affidavit) तसेच जबरदस्तीने सोन्या – चांदीचे दागिने काढून घेतल्याबद्दल मुलगा व सुनेसह …
सोलापूर,दि.२९ : खोट्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे ९० लाख रुपये वर्ग केले (Transferred Rs 90 lakh on the basis of false affidavit) तसेच जबरदस्तीने सोन्या – चांदीचे दागिने काढून घेतल्याबद्दल मुलगा व सुनेसह सहाजणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात जबरी चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत भंगरेव्वा महादेव बागदुरे ( वय ८१, रा. नरेंद्रनगर, सैफुल ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजशेखर महादेव बागदुरे ( वय ५८ ), राजश्री बागदुरे ( वय ५१ ), शारदा बागदुरे ( वय ४२ ), राकेश ऊर्फ सिद्धेश्वर बागदुरे ( वय ३०, सर्व रा. उत्तर कसबा, बाळीवेस ), राकेशचा मित्र माशाळ व शिवानंद नागणसुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या उमासा नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीमधील ७० लाख रुपये व जॉइंट खात्यातील २० लाख रुपये फिर्यादीच्या संमतीशिवाय खोट्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दोन्ही सुना राजश्री व शारदा यांच्या नावे ट्रान्स्फर करून घेतले तसेच २५ ऑगस्ट रोजी फिर्यादीस मारहाण करून अंगावरील १८ तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले.
त्याचप्रमाणे फिर्यादीच्या उत्तर कसब्यातील छोट्या तिजोरीतील १५० तोळे सोने व ५० तोळे चांदी, इतर मौल्यवान वस्तू तसेच खतावणी व कागदपत्रे फिर्यादीच्या संमतीशिवाय काढून घेतली आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक उदयसिंग पाटील हे करीत आहेत.
पुणे,दि.22 : माती गरम केले की त्यातून सोने निघते. मातीपासून सोने तयार करून देण्याच्या आमिषाने 50 लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. हडपसर येथील सराफाला 50 लाखाचा गंडा घातल्याची घटना घडली …
पुणे,दि.22 : माती गरम केले की त्यातून सोने निघते. मातीपासून सोने तयार करून देण्याच्या आमिषाने 50 लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. हडपसर येथील सराफाला 50 लाखाचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. बंगालवरून आणलेल्या मातीचे सोने होईल असे सांगून पुण्यातील हडपसर येथील विपुल नंदलाल वर्मा यांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. यामुळे सराफ व्यावसायिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मुकेश चौधरी, त्याचे काका आणि अन्य एक असे मिळून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विपुल नंदलाल वर्मा (राहणार हडपसर गाव) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर गावातील येथे पवन ज्वेलर्सचे नंदलाल वर्मा आणि आरोपी मुकेश चौधरी याची अंगठी खरेदीच्या निमित्ताने ओळख झाली होती. त्यानंतर अनेक वेळा दुकानात येणे जाणे सुरू होते. यामुळे त्यांची चांगल्या प्रकारे ओळख झाली. याचदरम्यान फिर्यादीच्या वडिलांसोबत देखील ओळख झाली.
आम्ही बंगालमधून माती आणली आहे. ती माती गरम केल्यानंतर त्याचे सोने होते असे सांगितले. तेव्हा काही माती हातचलाकी करून गरम करून सोने काढून दाखवले. हे पाहिल्यामुळे वर्मा यांचा चौधरी यांच्यावर विश्वास बसला. वर्मा यांना चार किलो माती देण्यात आली. माझ्या घरी लग्न असून मला पैसे पाहिजे अशी मागणी आरोपीने केली. त्यावर वर्मा यांनी आरोपी चौधरी याला सोन्याचे 48 तोळे दागिने आणि 20 लाखाची रोकड दिली.
त्यानंतर वर्मा यांनी आरोपी चौधरी याने दिलेली माती गरम करून सोने तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही केल्या सोने होत नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली असून तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे हडपसर पोलिसांनी माहिती दिली.