सोलापूर,दि.२० : कोरोना रूग्णांची संख्या परत वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यातही कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे यंदा पंढरपुरातील माघी यात्राही भक्ताविना साजरी होणार आहे. यात्रेसाठी २२ फेब्रुवारी रात्री १२ वाजल्यापासून २३ फेब्रुवारी रात्री १२ पर्यंत २४ तासाची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.
कोरोनामुळे यात्राकाळात कोणत्याही भाविकाला पंढरपूर शहरात येता येणार नाही. ही संचारबंदी पंढरपूर शहरासह परिसरातील १० गावात असणार आहे.
पंढरपुरसह काही गावात संचार बंदी
कमी झालेला कोरोना संसर्गजन्य रोग पुन्हा वाढताना दिसून येत आहे. यामुळे तीन दिवसावर आलेल्या माघ वारी संदर्भात शासनाने शुक्रवारी आदेश काढले आहेत. यामध्ये २२ फेब्रुवारी रात्री १२.०० वा. पासून ते २३ फेब्रुवारी रोजी रात्री १२.०० वा. पर्यंत (२४ तास) पंढरपूर शहराच्या आजूबाजूस असणारी गावात संचारबंदी अनेक सूचना दिल्या आहेत. त्या सूचना पुढील प्रमाणे आहेत.
●संचारबंदी :-
माघवारी निमित्त ३ ते ४ लाख भाविक पंढरपूरमध्ये असतात. माघवारी निमित्त कोरोनाच्या पार्श्वभुमी लक्षात घेता भाविक पंढरपूरमध्ये येऊ नयेत व पंढरपूर मध्ये गर्दी होऊ नये यासाठी दिनांक २२/२/२०२१ रोजी रात्री १२.०० वा. पासून ते दि.२३/२/२०२१ रोजी रात्री १२.०० वा. पर्यंत (२४ तास) पंढरपूर शहराच्या आजूबाजूस असणारी भटूंबरे, चिंचोळी भोसे, शेगांव दु, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव-शिरढोण व कौठाळी इत्यादी गावांमध्ये व संपूर्ण पंढरपूर शहरात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ मधील तरतुदीन्वये संचारबंदी आदेश लागू करणेत येत आहे. त्याबाबतचे स्वतंत्र आदेश निर्गमित करणेत येत आहे. सदर आदेशाचे पालन करणे सर्व सबंधितांवर बंधनकारक राहील.
●प्रवासी वाहतूक सेवा नियंत्रीत करणे :-
माघी वारीला बहुसंख्य वारकरी हे रेल्वे, एस.टी.महामंडळाची वाहने, खाजगी गाडयामधून येत असतात. माघ शुद्ध दशमी (दि.२२/०२/२०२१) व माघ शुद्ध एकादशी (दि.२३/०२/२०२१) या काळात ही वाहतूक सेवा पुर्णपणे बंद न करता नियंत्रीत ठेवावी, जेणेकरून सर्वसामान्य प्रवासी, वैद्यकिय सेवा व इतर सेवा चालू राहतील. मंदिर परिसरापासून दूरवर अंतरावर सर्वसामान्य प्रवासी उतरेल याबाबत आवश्यक ते नियोजन पोलीस विभाग, परिवहन विभाग व एस.टी.महामंडळ हे करतील.
●पायी दिंडयांना प्रतिबंध करणे:-
माघी यात्रेला राज्यभरातून ०३ ते ०४ लाख वारकरी राज्याच्या विविध भागातून येतात. राज्यभरातून २५० पेक्षा जास्त पायी दिंडया या काळात पंढरपूरला येतात. या दिंडया मराठवाडा, कोकण, विदर्भ, कर्नाटक, आंध्र, दक्षिण महाराष्ट्र या ठिकाणाहून येतात. कोरोना विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभुमीवर या पायी दिंडयांना पंढरपूर दिशेने प्रस्थानास बंदी करणेत येत आहे.
●मठांतील वारकरी संख्या नियंत्रीत असावी:-
पंढरपूर शहर व परिसरामध्ये जवळपास १२०० मठ असून यात्रेपूर्वी काही दिवस अगोदर या मठामध्ये बाहेरगावाहून वारकरी वास्तव्यास येण्याची शक्यता आहे. तसेच ६५ एकर परिसर, चंद्रभागा नदीपात्र याठिकाणीही वारकरी वास्त्यव्यास येत असतात. स्थानिक नगर परिषदेकडून वारी संपेपर्यंत मठांची दररोज तपासणी करणेत यावी. मठामध्ये नव्याने येणा-या सर्व लोकांना बंदी करणेबाबतच्या उपाययोजना उपविभागीय अधिकारी पंढरपूर व मंदिर समिती हे करतील. व त्यास प्रसिध्दी देतील. पोलीस विभागामार्फत मठ प्रमुखांच्या बैठका घेणेत येवून त्यांना सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटिस बजावतील.
●आरोग्य व्यवस्थापन :-
आरोग्य विभाग हा पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी, नगर पालिका प्रशासन तसेच इतर विभागाचे सर्व संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांची थर्मलस्क्रीनिंग करेल. तसेच पल्स ऑक्सी मीटरच्या सहाय्याने शरीरातील ऑक्सीजनची तपासणी करेल. मंदिर समिती सदस्य, सल्लागार समिती सदस्य, शासकीय कर्मचारी अधिकारी, यांच्या तपासणीसाठी Antigen Test kit 4/6 उपलब्धता करणेत येईल. तसेच १०८ ची रुग्णवाहिका सोबतच Cardiac Ambulance ही ठेवण्याचे नियोजन करणेत यावे. On Duty Staff ची काळजी घेणेसाठी त्यांना N-९५ मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करुन देणेत यावे.
● श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनाबाबत- संपूर्ण देशात व राज्यात कोविड-१९ संसर्गाचा धोका अदयापही कायम असल्याने व माघ यात्रेमध्ये भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मागील सात-आठ महिन्यामध्ये संपूर्ण गहाराष्ट्रात ज्याप्रमाणे रार्व धार्गिक सण यात्रा / यात्रा अत्यंत साध्या पध्दतीने लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. त्याप्रमाणे माघ यात्रेला होणारी गर्दी व कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता श्रींचे दर्शन माघ शुध्द दशमी (दि.२२/२/२०२१ ) व माघ शुध्द एकादशी (दि.२३/२/२०२१) या दिवशी बंद ठेवणेत यावे. तथापि श्रींचे परंपरेनुसार चालत असलेले सर्व नित्योपचार मंदिर समितीमार्फत कायम राहील. मंदिर व मंदिर परिसरात गर्दीवर नियंत्रण ठेवणेसाठी मंदिर समिती, उपविभागीय अधिकारी व पोलीस विभाग यांचेमार्फत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. उपरोक्त विधीवत पुजा करताना सबंधितांनी मास्कचा वापर करणे, सोशल डीस्टनसिंग चे पालन करणे, हात साबणाने स्वच्छ धुणे व आवश्यक तेथे सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.