अक्कलकोट,दि.19 : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील 36 जिल्हे, 365 तालुक्यातून अक्कलकोट तालुक्याने गेल्या वर्षभरात मराठा समाजातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता विविध उद्योग व्यवसायांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून देत आहे. तत्कालीन संचालक प्रशांत भगरे यांनी केलेल्या वेळोवेळीच्या पाठपुराव्या मुळे रुपये 5 कोटीचे उद्दिष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त पूर्ण झाले आहे.
शुक्रवारी अन्नछत्र मंडळाच्या परिसरात अण्णासाहेब पाटील महामंडळाचे लाभार्थी मनोज जाधव (रा.खासबाग गल्ली, अक्कलकोट) यांना अशोक लिल्यांड ई-कॉमेट या मालवाहतुक वाहनाच्या चावी वितरण अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, महाराष्ट्र बहुजन शिव जन्मोत्सव युवक मंडळाचे संस्थापक जेष्ठ नेते सुरेशचंद्र सूर्यवंशी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष व जेष्ठ नगरसेवक महेश इंगळे, श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, अक्कलकोट शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोज निकम, तत्कालीन संचालक प्रशांत भगरे, शहर शिवसेना प्रमुख योगेश पवार, प्रविण देशमुख, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष प्रविण घाडगे, शिवसेना शहर उपप्रमुख तेजस झुंजे व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील युवकांना उद्योग व्यवसायाच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण काम होत असल्याचे मनोगत महाराष्ट्र बहुजन शिव जन्मोत्सव युवक मंडळाचे संस्थापक व जेष्ठ नेते सुरेशचंद्र सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. दरम्यान अमोलराजे भोसले यांनी तालुक्यातील नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष व जेष्ठ नगरसेवक महेश इंगळे म्हणाले की, तत्कालीन संचालक प्रशांत भगरे यांच्या प्रयत्नाने गेल्या वर्षभरात राज्यातील 36 जिल्ह्यातील 365 तालुक्यातून अक्कलकोट तालुक्याने कर्जाचा रु.5 कोटी टप्पा पूर्ण केले असून तत्कालीन संचालक प्रशांत भगरे यांच्यामुळे पूर्ण शक्य झाले असल्याचे महेश इंगळे यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर म्हणाले, तत्कालीन संचालक प्रशांत भगरे हे एक गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता ते पत्रकार व राज्याच्या नावाजलेल्या महामंडळावर संचालक म्हणून त्यांनी केलेले अवघ्या 1 वर्षाच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात महामंडळाच्या माध्यमातून समाजातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली ही बाब उल्लेखनीय आहे. या महामंडळाच्या योजना अक्कलकोट तालुक्यास माहितही नव्हते, मात्र त्यांनी राज्याचा संचालक म्हणून कार्य करीत असताना देखील जिल्हा, राज्याबरोबरच त्यांनी अक्कलकोट तालुक्याला झुकते माप दिल्याचे निंबाळकर म्हणाले. मराठा समाजासाठी सतत कार्यरत राहणारे भगरे यांच्याबद्दल सार्थ अभिमान आहे. असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
याप्रसंगी लाभार्थी मनोज जाधव, संजय जाधव, अजय जाधव, वैभव नवले, शितल जाधव, राम मातोळे, गणेश भोसले, बाळासाहेब घाडगे, बाळासाहेब पोळ, विजय माने, चंद्रकांत कुंभार, किरण जाधव, संजय गोंडाळ, सागर गोंडाळ, वैभव मोरे, गोविंदराव शिंदे, विकी जाधव, महेश दिग्गे, आकाश शिंदे, शुभम कमनुरकर, अमित थोरात, ज्ञानेश्वर भोसले, संतोष माने, राहुल शिंदे, समर्थ घाडगे, फइम पिरजादे, किरण साठे, पिंटू साठे, विनायक तोडकर, सिद्धाराम कल्याणी, विशाल शिंदे, योगेश पवार, आकाश गडकरी, प्रथमेश पवार, दिनेश बंडगर, सुराज्य घाडगे, अतिश पवार, मुन्ना कोल्हे, एस.के.स्वामी, नितीन शिंदे, रोहित खोबरे, महांतेश स्वामी, निखील पाटील, सुरज सावंत, श्रीशैल कुंभार, संदीप नवले, लाला निंबाळकर यांच्यासह आदीजण उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व ते नियम पाळत कार्यक्रम संपन्न झाला.