• Solapur
  • August 3, 2021
0 Comments

सोलापूर, दि. २१ शालांत प्रमाणपत्र परीक्षेत श्री सिध्देश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलने घवघवीत यश संपादन करत प्रशालेने ही परंपरा कायम राखली आहे.

दहावी परीक्षेत प्रशालेच्या साहिया चिपडे हिने ९७.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच किरणकुमार बुरा ९६.८०, तनीष साळुंखे ९६.८० तसेच तेजस पुकाळे ९६.६०, आकांक्षा जाधव ९६.६० या विद्यार्थ्यांनी गुणानुक्रमे यश संपादन केले आहे. विषयानुरूप गुणवत्ता यादीत गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत वरूण कनकी, नवल मेरगू, नेहा कालीबत्ते

तर इंग्रजी विषयात आकांक्षा जाधव ९३. मराठी विषयात अवंती कुलकर्णी ८८ हिंदी विषयात वर्षाराणी घंटे ९०, संस्कृत विषयात वरुण कणकी याने ९९ गुण मिळवत • यश संपादन केले आहे. यशस्वी विद्याथ्र्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष धर्मराज काडादी, सदस्य व्ही. व्ही. बहाणपुरे, प्रा. जी.एन. कुमठेकर, भीमाशंकर पटणे, मल्लिकार्जुन कळके, गुरुराज माळगे, डॉ. राजशेखर येळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सी.बी. नाडगौडा समन्वयक संतोष पाटील, मुख्याध्यापक धनंजय शिरूर यांनी अभिनंदन केले.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!