• Solapur
  • August 3, 2021
0 Comments

दि.१८ : काळाच्या ओघात अनेक गोष्टी लुप्त होतात. तर कालांतराने अनेक गोष्टींचा विसर पडतो. मात्र काही घटना अशा असतात ज्या वर्षानुवर्षे लक्षात राहतात. लुप्त झालेल्या काही गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. या गोष्टी अब्जावधी किंमतीच्या मौल्यवान वस्तू, सोने असतील तर त्याचा शोध थांबवला जात नाही. कोलंबियाजवळ जवळपास ३०० वर्षांपूर्वी स्पेनचे San José हे जहाज बुडाले होते. या जहाजामध्ये तब्बल १४ अब्ज पौंड किंमतीचे सोने होते.

ब्रिटनसोबतच्या युद्धात स्पेनच्या या जहाजातील नाविक अनेक तास अडकले होते. या जहाजातील सोने लुटण्याचा ब्रिटीशांचाfo प्रयत्न होता. मात्र, स्पेनच्या नाविकांनी शेवटपर्यंत लढा दिला. अखेर या संघर्षात १४ अब्ज पौंड किमतीचे सोने आणि जवळपास ६०० जणांना जलसमाधी मिळाली.

डेली एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, हिस्ट्री वाहनीच्या एका माहितीपटामध्ये ग्लोबल एक्सप्लोरेशन्सचे ट्रेजर हंटर जेरी ली यांनी सांगितले की, हे जहाज पनामामध्ये होते. त्यात दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरून लुटलेले सोने होते. या ठिकाणी जहाज बराच वेळ थांबले होते. हे सर्व जहाजे एकत्रितपणे कोलंबियामध्ये जात होते. San José जहाजाचा शोध घेणारे ओशओशनॉग्रफिक इंजिनियर जेफ काइली यांच्यानुसार, माया साम्राज्यातून मोठ्या प्रमाणावरील सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन जात असणार.

अनेक दशकांपासून या खजिन्याचा शोध घेतला जात आहे. वर्ष २०१५ मध्ये कोलंबियाच्या सरकारने समुद्र पुरात्वतज्ज्ञ आणि वुड्स होल ओशनॉग्रफिक इन्स्टिट्यूशनला या जहाजाचे अवशेष शोधण्याचे काम सोपवले होते. या संस्थेने टायटॅनिक जहाजाचे अवशेष शोधले होते.

सोने मिळाल्यास मालकी कोणाची?
समुद्रात जलसमाधी घेतलेल्या अब्जावधी किंमतीच्या खजिन्याची मालकी कोणाकडे असेल याबाबतही चर्चा सुरू झाल्या आहेत. स्पेनच्या दाव्यानुसार, बुडालेले जहाज त्यांचे होते. त्यामुळे सोन्यावर त्यांचा दावा आहे. तर, सोने आमच्या हद्दीत असल्याने ते आमच्या मालकीचे असल्याचा दावा कोलंबियाने केला आहे. अँथ्रोपॉलजी आणि संचारचे प्राध्यापक टॉक थॉम्पसन यांनी म्हटले की, Incan साम्राज्याचे हे सोने होते. ट्रेजर हंटर जॉन मेटरा यांनी म्हटले की, खजिना कोलंबियाच्या क्षेत्रात असल्याने त्यांचा दावा अधिक मजबूत आहे. मात्र, अद्यापही दाव्याबाबत तोडगा निघाला नाही.

आतापर्यंत तरी जलसमाधी घेतलेल्या खजिन्याचा शोध लागला नाही. अनेक वर्षांपासून समुद्रात असल्यामुळे सोने, चांदी व इतर घटक खाऱ्या पाण्यामुळे झालेल्या अभिक्रियेमुळे विरघळून तर गेले नसतील का, अशीही शंका उपस्थित करण्यात येत आहे.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!