• Solapur
  • August 3, 2021
3 Comments

निकाल पाहण्यात अडचणी

कोरोनाकाळात परीक्षा न झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल (SSC Result) जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजता हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार होता. मात्र निकालाची वेबसाइट क्रॅश झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येणार आहेत. दुपारी 11 वाजता महाराष्ट्र बोर्डाने निकाल जाहीर केला होता. (SSC Result 2021 : Maharashtra Board 10th Students Result Website Crash ) त्यानंतर 1 वाजता वेबसाइटवर विद्यार्थी निकाल पाहू शकत होेते. मात्र आता वेबसाइट क्रॅश झाल्याची माहिती मिळत आहे. साधारणतः 16 लाख विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. या निकालाची उत्सुकता असताना वेबसाइट क्रॅश झाली आहे.

दरवर्षी एमकेसीएल सह इतर संकेतस्थळ निकाल पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जातात. त्याचप्रमाणे मोबाइलवर एसएमच्या माध्यमातून निकाल पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते. परंतु यंदा केवळ एकच संकेतस्थळ निकाल पाहण्यासाठी दिले होते. राज्यतील 16 लाखाहून अधिक  विद्यार्थ्यांनी या संकेतस्थलळा भेट दिल्याने त्यावर ताण आला. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल तयार करण्यात आला आहे. १०वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी एक वाजता पाहता येणार आहे. अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे. 99.95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

3 thoughts on “दहावीच्या निकालाची साईट क्रॅश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!