• Solapur
  • August 2, 2021
0 Comments

दि.21 : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. अनेक व्हिडिओ मजेशीर असतात. सर्कसमध्ये ट्रेनरच्या इशाऱ्यावर प्राणी नाचतात हे अनेकांनी पाहिले आहे. ट्रेनर जसा इशारा करील तसे हे प्राणी वागतात. पण कधी उंदीर इशाऱ्यावर नाचताना पाहिले नसतील. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात उंदीर इशाऱ्यावर नसताना दिसत आहेत.

हेही वाचा मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेन सोलापूर जिल्ह्यातील या गावांतून जाणार

आपल्या बोटांवर उंदरांना (Man control rats on finger) नाचवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरुण आपल्या बोटांवरच उंदरांना कंट्रोल करताना दिसतो. त्याचा हा व्हिडीओ पाहून त्याचं बोट आहे की जादूची छडी असाच प्रश्न तुम्हाला पडेल.

व्हिडीओत पाहू शकता, तरुणाकडे चार उंदीर आहे. सुरुवातीला तो एका उंदराला आपल्या एका बोटावर घेतो. तेव्हा हा उंदीर फिल्प मारताना दिसतो. त्यानंतर त्या उंदराला तो दूर फेकतो आणि पुन्हा आपल्या बोटांनी जवळ बोलवतो आणि त्याची जागा दाखवतो. उंदीर बरोबर तिथ जाऊन बसतो. इतर उंदरांसोबतसुद्धा तो तसंच करतो.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!