• Solapur
  • April 20, 2021
0 Comments

सातारा,दि.8 : सातारा येथे पत्रकारांशी बोलताना छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. राज्यातील चाललेल्या राजकारणावर, राज्यात सुरू असलेले राजकारण हा करमणुकीचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधारी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. मनसुख हिरेन, अँटिलिया बॉम्ब प्रकरण, परमबीर सिंह यांचं पत्र त्यापाठोपाठ आता सचिन वाझे यांचं पत्र यावरून राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप होत आहेत.

त्यावर आता भाजपा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “राज्याच राजकारण कुठं चाललंय हे पाहून मलाच आता कळायचं बंद झालंय. राज्यात सुरू असलेलं राजकारण हा करमणुकीचा भाग आहे”, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. राज्यातील घडामोडींचा, कोरोनाचा आणि राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊनचा यावेळी उदयनराजे भोसले यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला!

सातारा येथे पत्रकारांशी बोलताना छत्रपती उदयनराजे म्हणाले,”गो कोरोना गो कोरोना असे म्हणून कोरोना जाणार नाही. त्यामुळे शासनाने लावलेल्या निर्बंधांबाबत योग्य तो पुनर्विचार करावा आणि सर्वसामान्य माणसाला जगणे कठीण होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी. राज्य सरकारमध्ये बसलेले मुख्यमंत्री आणि मंत्री यांनासुद्धा जनतेची काळजी आहे. त्यांनाही कुटुंब, कार्यकर्ते, मतदार यांची काळजी आहे. त्यामुळे ते कोणताही निर्णय बेजबाबदारपणे चुकीचा घेणार नाहीत. मात्र, आरोग्य महत्वाचे आहेच पण खाण्याचे काय? याचाही विचार सरकारने करावा. त्यामुळे सरकारने लोकहिताचे निर्णय घ्यावेत. जगाच्या पोटात या संसर्गाने भीतीचा गोळा निर्माण केला. या आजाराच्या नुसत्या भितीने लाखो लोक हृदयविकाराने गेले. त्यामुळे लोकांनी न भिता संसर्गाचा सामना करावा”, असं छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *