• Solapur
  • April 20, 2021
0 Comments

सांगली,दि.९ : सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी कोरोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीची नाहीत असे म्हटले आहे. कोरोना हा रोग नसून, कोरोनाने मरणारी लोकं जगण्याच्या लायकीची नाहीत असं ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी कोरोना निर्बंधावरुनही टीका केली.

“मुळात कोरोना हा रोग नाही. कोरोनाने माणसं मरतात ती जगण्याच्या लायकीची नाहीत. कोरोना हा रोग नाही. हा ** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे. यामुळे काही होत नाही,” असं संभाजी भिडे गुरुजी यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी निर्बंधांवरुन टीका करताना म्हटलं की, “दारुची दुकानं उघडी…त्यांना परवानगी दिली आहे. पण कोणी काही विकत बसला आहे त्याला पोलीस काठ्या मारतात. काय चावटपणा चालला आहे. हा नालायकपणा, मूर्खपणा चालला आहे”.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *