• Solapur
  • August 3, 2021
0 Comments

दि.१६ : पेन्शन धारकांना WhatsApp द्वारे पेन्शन स्लिप मिळणार आहे. सरकारने पेन्शन धारकांना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी निर्णय घेतला आहे. पेन्शन धारकांचं आता एक मोठं टेन्शन दूर झालं आहे. लवकरच बँका आता पेन्शन धारकांना त्यांच्या पेन्शनची स्लीप व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पाठवण्यास सुरुवात करणार आहेत. सध्या बँका SMS आणि ई-मेलच्या माध्यमातून पेन्शन धारकांना सर्व माहिती देत आहेत. पण केंद्राच्या आदेशानंतर बँकांनी आता व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पेन्शन धारकांना त्यांना मिळणाऱ्या पेन्शनची स्लिप पाठविण्याची तयारी दर्शवली आहे.

पेन्शनच्या माध्यमातून पेन्शन धारकांना त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा होणाऱ्या रकमेची सविस्तर माहिती एसएमएस आणि ईमेलसोबतच व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडिया अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातूनही पाठवू शकतात. पेन्शन धारकांना सुविधा उपलब्ध व्हावी याच उद्देशानं याबाबतचा निर्णय सरकारनं घेतला आहे. 

पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात पेन्शन देणाऱ्या बँकांच्या केंद्रीय पेन्शन वितरण केंद्रांची एक बैठक झाली. यात पेन्शनधारकांच्या मासिक पेन्शनबाबत चर्चा झाली. याच बैठकीत पेन्शन धारकांना मोबाइल एसएमएस आणि ईमेलसोबतच आता व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पेन्शनची स्लिप पाठवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. याचा बँकांनाही स्वीकार केला आहे. 

पेन्शन स्लिपमध्ये असणार संपूर्ण माहिती
पेन्शन धारकांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून देणाऱ्या स्लिपमध्ये संबंधित पेन्शन धारकाला त्याच्या पेन्शनची आणि बँक खात्यातील रकमेची सविस्तर माहिती मिळणार आहे. 

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!