• Solapur
  • August 3, 2021
0 Comments

दि.१७ : अतिशय कठीण परिस्थितीत राहूनही भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास घडवणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा अनेक युवकांसाठी प्रेरणादायी आहे. भारतीय क्रिकेटमधील त्याचे योगदान हे उल्लेखनीय आहे. त्यामुळेच त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. युवकांच्या तो आदर्शस्थानी आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं २००७चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०११चा वन डे वर्ल्ड कप आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो जगातील पहिला व एकमेव कर्णधार आहे. आता महेंद्रसिंग धोनीचा प्रेरणादायी प्रवास शाळेत शिकवला जाणार आहे आणि त्याच्या आयुष्यावरील धडा शाळेच्या पुस्तकामध्ये आहे. सोशल मीडियावर त्याचा फोटो व्हायरल झाला आहे.

महेंद्रसिंग धोनीनं मागच्या वर्षी १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता धोनी फक्त इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतोय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत चॅप्टर ७ वर धोनीच्या आयुष्यावरील धडा आहे.  या फोटोत धोनीला टीम इंडियाचा कर्णधार म्हटले गेले आहे, त्यामुळे हा फोटो जुना असावा असा अंदाज लागतोय.  

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!