• Solapur
  • April 20, 2021
1 Comments

दि.4 : भारतात व अनेक जगात कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. अनेक देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार जनतेत जागृती निर्माण करण्याचे काम करत आहे. अनेक ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत.

मात्र भाजपच्या मंत्र्याने व राष्ट्रवादीच्या मंत्र्याने बेजबाबदार वक्तव्य केली आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. मात्र, आसाममधील आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी कोरोनाच्या संदर्भात अजब विधान केले आहे.

हेमंत बिस्वा सरमा यांना निवडणूक आयोगाने 24 तास प्रचार करण्यापासून रोखले आहे. मात्र, पत्रकारांशी संवाद साधताना सरमा यांनी अजब तर्कट मांडले आहे. कोरोना पळून गेला आहे. आसाममध्ये तरी मास्क घालण्याची काहीही गरज नाही, असा अजब दावा सरमा यांनी यावेळी बोलताना केला आहे. 

आसाममधील नागरिकांना मास्क घालण्याची गरज नाही. मास्क घातल्यामुळे जनतेमधील भीती वाढली आहे. मास्क घालण्याची गरज असेल, तेव्हा शासनाकडून सांगण्यात येईल. मास्क घालून लोकं फिरायला लागले, तर ब्युटी पार्लर कसे चालणार, असा सवालही त्यांनी यावेळी केला. तसेच अर्थव्यवस्थेत सुधारणा होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. 

राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालकेंच्या प्रचार सभेत बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बेजबाबदार वक्तव्य केले आहे. पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. प्रचारसभेत बोलताना जयंत पाटील यांनी जगात कोरोनाच नाही, त्यामुळे मी ही आता मास्क न घालता काढून ठेवल्याचं धक्कादायक आणि तितकेचं बेजबाबदार वक्तव्य केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार लाॅकडाऊन करण्याच्या विचारात असतानाच जयंत पाटील यांनी वक्तव्य केले आहे.

पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. ही बंदी झुगारून सध्या पंढरपुरात प्रचार सभा सुरू आहेत.

आज राझणी येथे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत प्रचार सभा झाली. मंत्र्यांच्या सभेत सोशल डिस्टन्सींग फज्जा उडाल्याचे ही दिसून आले. पोलिस काय कारवाई करणार याकडेच लक्ष लागले आहे.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

One thought on “आता मास्क घालण्याची गरज नाही : भाजपा व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे बेजबाबदार वक्तव्य

  1. ये देश विरोधी नेता केवल अपना मतलब सिद्ध करने के लिए जनता मरे कोई मतलब नहीं केवल राजनीति सर्वोपरि है केवल।सत्ता।का।स्वार्थ।है

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *