• Solapur
  • April 20, 2021
0 Comments

अहमदाबाद,दि.24 : जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमचं ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असे नामकरण करण्यात आले आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नरेंद्र मोदी स्टेडियमचं उद्घाटन केलं आहे. या उद्घाटन सोहळ्याला देशाचे गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. मोटेरा स्टेडियम आता ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ नावाने ओळखलं जाणार आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नरेंद्र मोदी स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या उद्घाटन सोहळ्याला देशाचे गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ स्टेडियम जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असून यामध्ये 1 लाख 10 हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था आहे.

असे आहे ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’
अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियम 700 कोटींहून अधिक खर्च करुन बांधले आहे. यामध्ये 1,10,000 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड स्टेडियम तयार करणार्‍या कंपनीने हे स्टेडियम डिझाइन केले आहे. यात 76 कॉर्पोरेट बॉक्स, चार ड्रेसिंग रूम आणि तीन सराव मैदाने आहेत. स्टेडियम व्यतिरिक्त, इनडोअर क्रिकेट अॅकाडमी व्यतिरिक्त जलतरण तलाव, स्क्वॅश आणि टेबल टेनिसची सुविधा आहे. मोटेरा स्टेडियमच्या लाईट्सही खूप वेगळ्या आहेत. फ्लड लाइट्स ऐवजी जागा एलईडी लाइट्स लावण्यात आल्या आहेत ज्या सौर उर्जेवर चालतात. याशिवाय स्टेडियममध्ये थ्रीडी थिएटरसुद्धा आहेत. ड्रेसिंग रूमशी जोडलेले उत्कृष्ट जिम देखील आहेत.

या उद्घाटन सोहळ्याला अमित शाह यांच्यासह गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, क्रीडामंत्री किरण रिजीजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते. अमित शाह यांनी म्हटलं की, आज खेळ जगतासाठी सुवर्ण दिन आहे. आज भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते भारतरत्न सरदार पटेल यांच्या नावे मोठ्या स्पोर्ट्स कॉम्लेक्सचं भूमीपूजन करण्यात आलं आहे.

सरदार पटेल स्पोर्ट्स कॉम्लेक्समध्ये जगातील सर्व खेळांची व्यवस्था असणार आहे. देशातील आणि जगातील सर्व खेळाडूंच्या ट्रेनिंग आणि राहण्याची व्यवस्था असणार आहे. याठिकाणी 3000 मुलांची एकाचवेळी खेळण्याची आणि राहण्याची व्यवस्था असणार आहे, असं अमित शाह यांनी सांगितलं.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *