• Solapur
  • May 15, 2021
1 Comments

वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर निर्णय

सोलापूर,दि.17 : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे त्या अनुषंगाने शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्या करिता महापालिका आणि जिल्ह्य प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना व प्रयत्न केले जात आहेत, तरीदेखील देखील करोना आटोक्‍यात येताना दिसत नाही. (Municipal Corporation will start Kovid Center in Solapur city through local social organization)

कोरोना सारख्या महामारीवर नियंत्रण मिळविण्या साठी पालिकेला लोकसहभाग आवश्यक आहे म्हणून पालिका प्रशासनाकडून कोरोना सारख्या महामारीवर प्रतिबंधात्मक उपाय करण्या करिता स्थानिक सामाजिक संस्थेला सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. सेवाभाव वृत्तीने शहरातील काही सामाजिक संस्था संघटना कोविड केअर सेंटर चालू करून इच्छित असल्यास अशा संघटना संस्थेनी पालिकेशी संपर्क साधून परवानगी घ्यावी.

योग्य त्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वातसह परवानगी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशीही माहिती सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली. एखाद्या संस्थेने कोविड केअर सेंटर चालू करून कोरोनाच्या प्रादुर्भावावर प्राथमिक उपाचार करण्यास परवानगी देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात जैन सोशल गृप,जमाते उलेमा, ग्रामीण पोलीस मुख्यालय आणि शहर पोलीस आयुक्तालया कडून कोविड केअर सेंटर उभारण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे उपायुक्त धनराज पांडे यांनी सांगितले.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

One thought on “सोलापूर शहरात महापालिका स्थानिक सामाजिक संस्थेच्या मार्फत कोविड सेंटर सुरू करणार

  1. सोमपा ने आजपर्यंत के केले। स्वतःच्या इस्पितळात काय सुविधा निर्माण केल्या।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *