• Solapur
  • August 2, 2021
0 Comments

दि.17 : टीम इंडियाचा माजी कॅप्टन मोहम्मद अझहरुद्दीनची (Mohammad Azharuddin) हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या (HCA) अध्यक्षपदावरुन निलंबित करण्यात आले आहे. असोसिएशननं अझरला कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे. अझरवरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तो अध्यक्षपदावरुन निलंबित असेल. त्याचबरोबर त्याचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. अझहरुद्दीनवर मनमानी निर्णय घेणे, हितसंबंधांची माहिती न देणे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.

काय आहे नोटीस?

अझहरुद्दीन विरुद्ध सदस्यांनी केलेल्या तक्रारीनंतर त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. अझरवर नियमभंग करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अझहरुद्दीन दुबईतील एका क्रिकेट क्लबचा सदस्य आहे. हा क्लब बीसीसीआयनं मान्यता न दिलेल्या स्पर्धेत खेळतो. याबाबतची माहिती अझहरुद्दीननं असोसिएशनपासून लपवून ठेवल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.अझहरुद्दीन 27 सप्टेंबर 2019 रोजी एचसीएचा अध्यक्ष बनला. त्यानंतर त्याची कारकिर्द सतत वादग्रस्त ठरली आहे.

अझहरुद्दीननं भारताकडून 334 वन-डेमध्ये 36 पेक्षा जास्त सरासरीनं 9378 रन काढले आहेत. यामध्ये 7 शतक आणि 58 अर्धशतकांचा समावेश आहे. तर त्याने टेस्टमध्ये 45.03 च्या सरासरीनं 6215 रन काढले आहेत.यामध्ये 22 शतक आणि 21 अर्धशतकं आहेत.

जगातील कलात्मक बॅट्समनमध्ये अझरची गणना होते. तो भारताचा यशस्वी कॅप्टनही होता. क्रिकेट कारकिर्दीमधील पहिल्या तीन टेस्टमध्ये शतक करणारा तो जगातील एकमेव बॅट्समन आहे. त्याचबरोबर वन-डे क्रिकेटमध्ये 9000 रनचा टप्पा पार केलेला तो पहिला खेळाडू आहे.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!