• Solapur
 • May 15, 2021
2 Comments

सोलापूर,दि.13 : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले होते. कोविड टास्क फोर्सच्या बैठकीतही सदस्यांनी कडक लॉकडाऊनचे समर्थन केले होते. महाविकास आघाडी सरकारवर अनेक मंत्र्यांनी लॉकडाउन घोषित होण्याची शक्यता वर्तवली आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की मधल्या काळात आपण कोरोनावर नियंत्रण मिळवले होते. परंतु आता परत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांचा आजचा आकडा सर्वाधिक, कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.

राज्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले. कोरोना प्रादुर्भावामुळे वैद्यकीय सुविधांवर भार पडल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. लसीकरण केल्यानंतर प्रतिकार शक्ती तयार होण्यास वेळ लागतो. पहिल्या लाटेपेक्षा ही लाट जास्त धोकादायक आहे.

इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे, यातचं हवाई माध्यमातून आपल्याला ऑक्सिजन मागवता येईल, याची मागणी आम्ही केंद्राकडे करणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

औषधांची, हॉस्पिटलची, कमतरता जाणवत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्था तोकडी पडत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात लीसकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढवला आहे.

कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे आहे. त्यासाठी काही कडक निर्बन्ध लावावे लागतील. असे मुख्यमंत्री म्हणाले. नवीन निर्बन्ध उद्यापासून लागू करण्यात येतील.

उद्यापासून राज्यात 144 कलम लागू. उद्या रात्री 8 पासून राज्यात संचारबंदी. सर्व आस्थपना बंद राहतील. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. सकाळी सात ते रात्री 8 पर्यंत फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवणार. ई कॉमर्स सेवा, दूरसंचार सेवा सुरू राहतील.

हॉटेलला पार्सल सेवा सुरू ठेवता येणार. आता लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास वीकेंड लॉकडाऊनमधील सर्व निर्बंध इतर दिवशीही असतील व त्यात नव्याने काही सुधारणा केल्या जातील.

लॉकडाऊनकाळात संचारबंदी लागू केली जाईल. त्यामुळे अत्यावश्यक व वैद्यकीय कारणाशिवाय कुणालाही फिरता येणार नाही.

15 दिवसांसाठी महाराष्ट्र संचारबंदी, एक महिन्यासाठी मदत करणार, शिवभोजन मोफत देणार, 2 किलो तांदूळ, 3 किलो गहू मोफत देणार, एकूण 7 कोटी लोकांना धान्य देणार

राज्यात बस, रेल्वे, हवाईवाहतुक सुरू ठेवणार, कोरोनावायरस साखळी तोडण्यासाठी 7 कोटी लोकांना मिळून 3 हजार कोटी पेक्षा जास्त मदत जाहीर, अत्यावश्यक सेवा सोडून सगळं बंद.

सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सार्वजनिक वाहतूक सुरू
कारण नसताना घराबाहेर पडल्यास कारवाई होणार
उद्या रात्री 8 वाजल्यापासून निर्बंध लागणार
लॉकडाऊन सदृश्य निर्बंध आहेत- उद्या रात्री 8 वाजल्यापासून अंमलबजावणी

 • उद्या रात्रीपासून ब्रेक द चैनसाठी राज्यात संचारबंदी
 • पुढील 15 दिवस संचारबंदी
 • येणे जाणे पूर्ण बंद
 • आवश्यक काम नसेल तर घराबाहेर पडायचे नाही
 • अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद
 • सार्वजनिक वाहतुक म्हणजे लोकल, बस व्यवस्था सुरू राहणार
 • त्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी वापरले जाणार
 • वैद्यकीय सेवा, लस उत्पादक, वैद्यकीय वाहतुक, वैद्यकीय साहित्य वाहतूक सुरू राहणार
 • त्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी वापरले जाणार
 • वैद्यकीय सेवा, लस उत्पादक, वैद्यकीय वाहतुक, वैद्यकीय साहित्य वाहतूक सुरू राहणार
 • शीतगृह, जनावरांचे दवाखाने, शेतीची कामे सुरू राहतील
 • बँका, आर्थिक संस्था, अधिस्वीकृती धारक पत्रकार सुरू राहणार
 • बांधकाम साईट सुरू राहणार, तिथे काम करणारे कर्मचार्‍यांची तिथेच राहण्याची व्यवस्था करण्याची अट
  हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद, मात्र होम डिलिव्हरी सुरू राहणार
 • रस्त्यावरील खाद्यपदार्थ सेवा सुरू राहणार
  ​ लाभार्थीना ३ किलो गहु आणि दोन किलो तांदुळ एक महिना मोफत
 • सात कोटी लोकांना मोफत धान्य

Author

aajtaksolapurnews@gmail.com

2 thoughts on “उद्यापासून महाराष्ट्रात संचारबंदी लागू

 1. सध्याच्या परिस्थितीत योग्य निर्णय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *