• Solapur
  • June 19, 2021
3 Comments

दि.12 : महाराष्ट्रात वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात 15 मे पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता. अनेक शहरी भागात रुग्णांची संख्या कमी होत आहे परंतु ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी होत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, असे असतानाही काही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळेच राज्यातील लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतला असल्याचे वृत्त आहे. सध्या ब्रेक द चेन (Break the chain) अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे 15 मे पर्यंत कायम होते त्यानंतर आता हे निर्बंध वाढवून 31 मे पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात यावा अशी सर्वांनीच मागणी केली त्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार यापूर्वी ब्रेक द चेन अंतर्गत लागू असलेले कठोर निर्बंध या कालावधीत सुद्धा लागू असणार आहेत.

लॉकडाऊन लागू केल्याने मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरांत कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागला आणि रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील इतर भागांतील कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी हे कठोर निर्बंध आणखी 15 दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे वृत्त आहे. लॉकडाऊननंतर घटत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या प्रदीर्घ चर्चेमध्ये राज्यातील लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवण्याबाबत चर्चा झाली. (Lockdown in Maharashtra) तसेच हा लॉकडाऊन काही दिवस करण्यात यावा, अशी मागणी मंत्रिमंडळाने केली आहे. मात्र आता त्याबाबतचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. 

लॉकडाऊन वाढवण्यावर मंत्रिमंडळात एकमत, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार
राजेश टोपे म्हणाले, “लॉकडाऊन दरम्यान कोरोना रुग्णसंख्या कमी झाली. लॉकडाऊन केल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या 7 लाखांवरून 4 लाख 75 हजारवर आलीय. महाराष्ट्राच्या रुग्णवाढीचा दर भारताच्या रुग्णवाढीच्या दराच्या निम्मा आहे. त्यामुळे ही संख्या आणखी कमी करण्यासाठी राज्यात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची एकमताने मागणी बैठकीत झाली. याबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

3 thoughts on “महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन वाढवला; 31 मे पर्यंत निर्बंध लागू

  1. Lockdown chy काळातील ग्रंथालय सेवकाचे माहे एप्रिल 2020 ते एप्रिल 2021 चे वेतन मिळाले नाही, ग्रंथालय सेवकांनी ks जीवन जगावे, प्रथमच त्यांना तुटपुंजे वेतन आहे तेही अद्याप मिळाले नाही, त्यांची lockdown काळात उपासमार होत आहे, त्यांचेकडे कोण लक्ष देणार,

  2. Mi adipasun je vichar kelto tech hoty ..mnje yamde fakt ani fakt rajakaran ahe ..Balasaheb Thakare hote tr asli samasya tevach mitali asti yavr vichar kra cm ani tyanche sahakari ..mi kattar shivsena ahe te pn Balasaheb cha shivsena te mitvu deu nka

  3. Lockdown se contentment zone nusar band kara purna jantela trass hot ahe va aarthik paristhiti khalawat ahe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!