• Solapur
  • August 3, 2021
0 Comments

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याची लोकप्रियता अगणित आहे. जगभरात त्याचे चाहते आहे आणि इंस्टाग्रामवरील त्याच्या फॉलोअर्सचा आकडा पाहून त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज लावला जाऊ शकतो.

इंस्टाग्रामवर विराटचे १३ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि यो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीयांमध्येही तो अव्वल आहे. शेड्युलिंग टूल HopprHQ नं इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली. Hopper HD Instagram Richlist 2021

Hopper HD Instagram Richlist 2021 यादीनुसार विराट कोहलीला इंस्टाग्रावर एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी ६ कोटी रुपये मिळतात.

दोन वर्षांपूर्वी इंस्टाग्रामवरील एका पोस्टमागे विराट १.३५ कोटी कमवत होता आणि दोन वर्षांत त्याची कमाई तीनपटीनं वाढली. या यादीत टॉप २०मध्ये विराट हा एकमेव भारतीय आहे आणि तो १९व्या क्रमांकावर आहे.

इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटीमध्ये पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Christiano Ronaldo) अव्वल स्थानावर आहे. तो एका स्पॉन्सर्ड पोस्टमागे ११.९ कोटी रुपये कमावतो.

नुकतेच रोनाल्डोच्या इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या ३० कोटींच्या घरात गेली. इतके फॉलोअर्स असलेला तो पहिलाच सेलिब्रेटी आहे. त्यानंतर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या सेलिब्रेटींमध्ये WWE स्टार ड्वेन जॉन्सन याचा क्रमांक येतो. त्याचे २४ कोटी फॉलोअर्स आहेत.

रोनाल्डोनं मार्च २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत इंस्टाग्रामवरील कमाई ही ५०.३ मिलियन डॉलर इतकी आहे.

फुटबॉल क्लब युव्हेंटससोबत त्यानं ३३ मिलियन डॉलरचा करार केला आणि त्यापेक्षा अधिक कमाई तो इंस्टाग्रामवरून करतो. २०१९मध्ये तो एका पोस्टमागे ६.७३ कोटी कमवत होता.

खेळाडूंच्या बाबतीत विचार केला तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. लियोनेल मेस्सी व नेयमार हे अनुक्रमे ८.६ कोटी व ६.१ कोटींसह दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

टॉप १०० मध्ये विराटसह बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा २७ व्या क्रमांकावर आहे. ती एका पोस्टमागे ३ कोटी कमावते.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!