• Solapur
  • August 3, 2021
0 Comments

दि.22 : गुरुवारी सकाळी देशभरातील मीडिया ग्रुप दैनिक भास्करच्या (Media group Dainik Bhaskar) अनेक कार्यालयांमध्ये आयकर छापे टाकण्यात आले. सूत्रांनी सांगितले की भास्कर समूहावर कर चोरीचा आरोप आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात दैनिक भास्कर यांच्या कार्यालयाचा परिसरात तपासणी केली. दैनिक भास्करच्या प्रमोटर्सच्या घरांवर तसेच कार्यालयांवरही छापे टाकण्यात आले. दैनिक भास्करचे वरिष्ठ संपादक यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, भास्कर समूहाच्या जयपूर, अहमदाबाद, भोपाळ आणि इंदूर कार्यालयांवर छापेमारी सुरू आहे.

एप्रिल-मे मध्ये कोविड – 19 च्या दुसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणात झालेल्या हानीची बातमी दैनिक भास्कर या वृत्तसंस्थेने दिली. भास्करने कोरोनाव्हायरस बाबत सरकारने केलेल्या दाव्यांची पोलखोल करत लेखमाला छापली होती. सर्व देशभर असलेल्या साथीच्या रोगांदरम्यान झालेल्या दाव्यावर टीका करणार्‍या अनेक मालिका प्रकाशित केल्या ज्यामध्ये ऑक्सिजन, रुग्णालयाच्या बेड्स आणि लसींच्या अभावामुळे लोकांना होणाऱ्या मोठ्या संकटावर प्रकाश टाकला. या कव्हरेजमुळे यूपी आणि बिहारमधील शहरांमध्ये गंगा नदीत तरंगणाऱ्या कोव्हीड बाधितांच्या मृतदेहाची भयावह स्थिती उघडकीस आली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत (Bharat Samachar) समाचार या उत्तर प्रदेशातील टीव्ही वाहिनीच्या आवारातही छापे टाकण्यात आले. प्राप्तिकर अधिका-यांच्या पथकाने लखनौचे कार्यालय आणि संपादकाचे घराची झडती घेतली. वाहिन्यांकडून कर चुकविल्याच्या ठोस पुराव्यांच्या आधारे हे छापे टाकण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. भारत समाचारच्या नुकत्याच झालेल्या बातमीपत्रात यूपी सरकारवर टीका करण्यात आली होती.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!