• Solapur
  • May 15, 2021
0 Comments

दि.19 : महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. नागरिकांकडून निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच किराणा दुकानांची वेळ सकाळी 7 ते 11 करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री यांनी दिली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो असंही राजेश टोपे यांनी म्हटलं. निर्बंध अधिक कडक करण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. ब्रेक द चेन साधायचे असेल तर यापुढे गरज पडेल तसं आणखी गोष्टी कडक केल्या जातील, असं त्यांनी म्हटलं.

येत्या 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये आणखी कडक निर्बंध केले पाहिजेत. राज्यात कडक निर्बंध लागू केलेले असतानाही अनेक लोक विनाकारण बाहेर रस्त्यावर फिरणाताना दिसत आहेत. त्यांना आळा घालण्यात यासाठी किराणा दुकाने 7 ते 11 या दरम्यान सुरु ठेवण्याबाबतची चर्चा झाली आहे. जिल्हास्तरावर याबाबत निर्णय घेतले जावे याबाबतही चर्चा झाली, असं राजेश टोपे यांनी म्हटलं. दुर्गम भागातील जिल्ह्यात जेथील कलेक्टरचा संबंध रोज मंत्रालयाशी होत नाही. तिथे पालक सचिवांनी अधिक ॲक्टिव्हली काम केलं पाहिजे. त्यांनी आपापल्या जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण ठेवावं, अशीही चर्चा झाली.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *