• Solapur
  • June 19, 2021
9 Comments

दि.२८ : भारतात वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. आजपासून (दि.२८) १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे. आज दुपारी ४ पासून लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे.

देशात १८ वर्षांवरील तरुणांसाठी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात येत्या १ मे पासून लसीकरण सुरु होणार आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठीच लसीकरण उपलब्ध होतं. आता मात्र १८ वर्षांवरील व्यक्ती लस घेण्यासाठी पात्र ठरणार आहे. लसीकरणासाठी १ मे रोजी संबंधित राज्यांत किती सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्र तयार आहेत त्यानुसारच नागरिकांना आपल्या नावाची नोंदणी करता येणार आहे तसंच यावर लसीकरणाचा वेग अवलंबून राहणार आहे.

लस घेण्यासाठी १८ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला आपल्या नावाची ऑनलाईन नोंदणी करणं अनिवार्य आहे. यासाठी आज (बुधवारी) सायंकाळी ४.०० वाजल्यापासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार आहे. ‘कोविन’ या अधिकृत वेबसाईटवर नागरिकांना आपल्या नावाची नोंदणी करणं आणि लसीकरणासाठी वेळ निश्चित करणं अनिवार्य आहे.

१८ वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीकरण सुरु झाल्यानंतर लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊन गोंधळ वाढण्याची शक्यता असल्यानं या वयोगटाला नोंदणी करणं आवश्यक आहे.

मात्र, ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी ऑनसाईट रजिस्ट्रेशनचा अर्थात नोंदणी केंद्रावर जाऊनही नाव नोंदणी करण्याचा पर्याय अगोदरप्रमाणेच खुला राहील.

लसीकरणात सहभागी होणाऱ्या १८ वर्षांवरील नागरिकांसाठी बुधवारी सायंकाळी ४.०० वाजल्यापासून ऑनालाईन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे.

तुम्ही कोविन वेबसाईट (www.cowin.gov.in) किंवा आरोग्य सेतू ॲपवर आपल्या नावाची नोंदणी करू शकता.

कसं कराल रजिस्ट्रेशन?

  • आरोग्य सेतू मोबाईल ॲपवर कोविन डॅशबोर्ड दिसेल किंवा www.cowin.gov.in इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन / रजिस्टरवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर आपला १० अंकी मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर रजिस्ट्रेशनचा दुसरा टप्पा सुरू होईल
  • यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स यांसारख्या फोटो आयडी कार्डपैंकी एकाची निवड करावी लागेल.
  • तसंच नाव, जन्मतारीख, लिंग यासारखी माहिती भरावी लागेल
  • यानंतर समोर दिसणाऱ्या पेजवर एकाच मोबाईल क्रमांकाच्या सहाय्याने तुम्हाला जास्तीत जास्त चार लाभार्थींची नावं जोडता येतील.
  • त्यानंतर तुमच्या ठिकाणाचा पिन कोड क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला लसीकरण केंद्रांची एक यादी दिसेल. यापैंकी एका केंद्राची निवड तुम्हाला करावी लागेल
  • त्यानंतर तुम्ही तुमच्या सोईप्रमाणे लसीकरणासाठी तारीख आणि वेळ निवडू शकाल

काय असेल लसीची किंमत?
बहुतांश राज्य सरकारकडून १८ ते ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण मोफत करण्याची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळे सरकारी केंद्रांवर तुम्हाला मोफत लस मिळू शकेल. मात्र, खासगी लसीकरण केंद्राची निवड केली तर तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत.

सध्या खासगी कोविड १९ लसीकरण केंद्र केंद्र सरकारकडून लस खरेदी करून २५० रुपये प्रती डोस फी आकारात आहेत. परंतु, १ मेपासून ही व्यवस्था संपुष्टात येईल आणि खासगी रुग्णालयांना थेट लसनिर्मात्या कंपन्यांकडून डोस खरेदी करावे लागतील. खासगी रुग्णालयांना कोव्हिशिल्डच्या प्रत्येक डोससाठी ६०० रुपये तर कोव्हॅक्सिनच्या प्रत्येक डोससाठी १२०० रुपये मोजावे लागणार आहे.

राज्यांना आता केंद्राकडून मिळणार नाहीत तर थेट लसनिर्मात्या कंपन्यांकडून लसीचे डोस खरेदी करावे लागणार आहेत. राज्य सरकारला कोव्हिशिल्डच्या एका डोससाठी ४०० रुपये तर कोव्हॅक्सिनच्या एका डोससाठी ६०० रुपये मोजावे लागणार आहेत. परंतु, नागरिकांना मात्र सरकारी रुग्णालयांत लस मोफत दिली जाणार आहे.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

9 thoughts on “आजपासून १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीकरणासाठी नोंदणी करता येणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!