• Solapur
  • August 3, 2021
0 Comments

दि.18 : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी केंद सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. अनेक शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्याची इच्छा असते परंतु पैश्या अभावी ते करू शकत नाहीत. शेती करिता ट्रॅक्टर खरेदी करण्याची इच्छा अनेक शेतकऱ्यांना असते मात्र पैश्या अभावी ते खरेदी करू शकत नाहीत. या करिता केंद्र सरकार (मोदी सरकार) शेतकऱ्यांच्या मदतीला येणार आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक कामांसाठी विविध उपकरणांची आवश्यकता भासते. ट्रॅक्टर देखील यापैकी एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र काहींना आर्थिक अडचणींमुळे ट्रॅक्टर खरेदी करणं शक्य होत नाही, अशावेळी मोदी सरकारने (Modi Government) या शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी ट्रॅक्टर खरेदीवर सब्सिडी देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव पीएम शेतकरी ट्रॅक्टर योजना (PM Kisan Tractor Yojna) असे आहे.

50 टक्के मिळणार सब्सिडी
केंद्र सरकार या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देते आहे. यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी करू शकतात आणि तेही निम्म्या किंमतीत. उर्वरित अर्धे पैसे अनुदान म्हणून सरकारकडून दिले जातील. अनेक राज्य सरकार आपापल्या स्तरावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर 20 ते 50 टक्के अनुदानही उपलब्ध करुन देत आहेत.

अशाप्रकारे मिळवा फायदा
सरकारकडून या योजनेचा फायदा त्याच शेतकऱ्यांना मिळेल जे एक ट्रॅक्टर खरेदी करतात. अर्थात केवळ एकाच ट्रॅक्टरच्या खरेदीवर तुम्हाला 50 टक्के अनुदान मिळेल. याकरता शेतकऱ्याकडे आधार कार्ड, बँकेचा तपशील, जमिनीची कागदपत्र, पासपोर्ट साइझमधील फोटो इ. दस्तावेजांची आवश्यकता आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याासठी शेतकरी कोणत्याही जवळच्या CSC सेंटरवर जाऊन अर्ज करू शकतात.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!