• Solapur
  • May 15, 2021
1 Comments

सोलापूर,दि.16 : सोलापूर शहरात दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढतच आहे. मृतांची संख्या वाढत आहे. स्मशान भूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा अपुरी पडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात 14 एप्रिल रात्री 8 पासून लॉकडाऊन जाहीर केला आहे. 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे.

अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढले होते. परंतु केवळ अत्यावश्यक सेवाच चालू असून देखील नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना दिसत आहे.

त्यामुळे वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर शहरातील किराणा दुकान, भाजीपाला, दूध हे उद्यापासून सकाळी 7 ते 1 या वेळेतच चालू राहतील असे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शंकर यांनी सोलापूर आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. वैद्यकीय अत्यावश्यक सेवा वगळून सर्वांना या वेळेतच दुकाने व्यवहार चालू ठेवता येतील.

अत्यावश्यक असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे अन्यथा घरीच सुरक्षित रहावे असे आवाहन आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे. सोलापूर आकाशवाणीवरून आयुक्त पी. शिवशंकर यांची मुलाखत प्रसारित होईल. आज रात्री (दि.16) 8:30 वाजता व उद्या (दि.17) सकाळी 9:30 वाजता आयुक्त पी. शिवशंकर यांची मुलाखत सोलापूर आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होईल.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

One thought on “सोलापूर शहरातील अत्यावश्यक सेवांसाठी आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढले सुधारित आदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *