• Solapur
  • August 3, 2021
0 Comments

दि.8 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पराभवानंतर टीम इंडिया इंग्लंडसोबत 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यासाठी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सराव म्हणून व्यायाम करत आहे. पण या व्यायामाचा व्हिडीओ शेअर केल्याने त्याला फॅन्सनी सुनावलं आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) कायम कोणत्या न कोणत्या कारणासाठी सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्याच्याकडे एक क्रिकेटपटूसह फिटनेस आणि स्टाईल आयकॉन म्हणूनही पाहिलं जातं. तो त्याच्या फिटनेसकडे खूप लक्ष देतो. त्याच्या व्यायामसह खाण्यापिण्याचे वेळापत्रक आणि गोष्टीही सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तोही अनेकदा आपले वर्कआऊट व्हिडीओ पोस्ट करतो. पण अलीकडेच त्याने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओवरुन त्याला फॅन्सकडून ऐकून घ्यावं लागलं आहे.

नुकत्याच झालेल्या WTC Final मध्ये भारताला न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे कोहलीचे कर्णधार म्हणून आयसीसी चषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा अपूरेच राहिले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून तो जास्त काही पोस्ट करतान दिसत नव्हता. पण त्याने नुकताच एक वर्कआउटचा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे.

विराट कोहली ट्रोल
विराट कोहलीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तो वेटलिफ्टिंग करताना दिसत आहे. त्याने 2-3 छोटे व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यावर फॅन्सनी विराटला ट्रोल करत काही कमेंट्स लिहिल्या आहेत. फॅन्सनी विराटला फलंदाजीवर लक्ष देण्याच सल्ला दिला आहे. तर काहींनी क्रिकेट सोडून वेटलिफ्टिंग कर आणि त्यात देशाला सुवर्णपदक मिळव असा खोचक सल्लाही दिला आहे. तर काही निराश चाहत्यांनी वजन नको आयसीसी चषक उचल असाही सूर लावला आहे.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!