• Solapur
  • August 3, 2021
0 Comments

दि.22 : स्मार्टफोन (Smartphone) अनेकजण वापरतात. बऱ्याचवेळा थर्ड पार्टी ॲप डाउनलोड केल्यामुळे फोनमध्ये मालवेअर येतो. हॅकर्स याद्वारे तुमच्या स्मार्टफोनवर ताबा मिळवतात. फोनमधील महत्वाची माहिती चोरली जाते. आर्थिक नुकसान होऊ शकते. मात्र आज आम्ही तुम्हाला असे काही नंबर्स सांगणार आहोत जे करून तुम्ही तुमच्या फोनवर कोणाची नजर तर नाही ना? हे जाणून घेऊ शकणार आहात. चला तर मग जाणून घेऊया.

*#62#

जर तुमच्या फोन कुठल्या दुसऱ्या ठिकाणी फॉरवर्ड होत असेल तर या कोडद्वारे तुम्ही हे जाणून घेऊ शकता. यासाठी वरील कोड तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड फोनवरून (Android Phones) डायल करायचा आहे, तसंच जर तुमच्या स्मार्टफोनच्या सेन्सॉरद्वारे तुम्हाला कोणी ट्रॅक करत असेल तर या कोडद्वारे तुम्हाला हे ही माहिती होऊ शकणार आहे.

##002#

जर तुम्हाला तुमच्या फोनमधून सर्व प्रकारची रिडायरेक्टिंग बंद करायची असेल वरील दिलेला कोड आपल्या मोबाईलमध्ये डायल करा. जर तुम्ही रोमींगमध्ये जाणार असाल किंवा आंतरराष्ट्रीय कॉल्स (International Calls) करणार असाल तर तुम्ही या कोडद्वारे सर्व फॉरवर्ड होणारे कॉल्स बंद करू शकता.

*#21#

वरील दिलेला कोड आपल्या स्मार्टफोनमध्ये डायल करा आणि कॉलची बटन दाबा. यामुळे तुम्हाला तुमचे कॉल कुठल्या दुसऱ्या नंबरवर फॉरवर्ड तर होत नाहीत ना याबद्दल माहिती मिळेल. इतकंच नाही तर तुमचा कोणता कॉल फॉरवर्ड होतोय तसंच किती नंबरवर फॉरवर्ड होतोय हे यामुळे आपल्याला कळणार आहे. हॅकर्स तुम्हाला येणारे कॉल्स मुद्दाम त्यांच्या नंबरवर फॉरवर्ड करतात. तसंच तुमच्यावर नजर ठेवण्यासाठीही हॅकर्सकडून याचा उपयोग होऊ शकतो. मात्र या कोडद्वारे तुम्ही तुमच्या फोनवर कोणाची नजर असल्यास हे माहिती करून घेऊ शकता.

*#06#

हा नंबर तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये डायल करून आपल्या स्मार्टफोनचा IMEI नंबर माहिती करून घेऊ शकता. जर तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तुम्ही या नंबरच्या मदतीनं तुम्ही आपला मोबाईल शोधू शकता किंवा ट्रॅक करू शकता.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!