• Solapur
  • June 19, 2021
2 Comments

सोलापूर,दि.१५ : महाराष्ट्रात वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १५ मे नंतरही लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर शहरात लॉकडाऊन बाबत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सुधारित आदेश काढले आहेत. ज्याअर्थी शासनाकडील दि. २९/०४/२०२१ च्या आदेशान्वये राज्यात कोव्हिड १९ संसर्गाचा प्रादुर्भाव असलेने कोव्होड-१९ विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आणि तातडीने उपाययोजना करण्यासाठी यापूर्वी निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.

सदरचे प्रतिबंध लागू करूनही सोलापूर शहरातील कोराना बाधित रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत असल्याने कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटणेसाठी सोलापूर शहरातील सार्वजनिक हिताच्या दृष्टीने दिनांक १५/०५/२०२१ रोजीचे सकाळी ०७.०० वा. पासून दि. ०१.०६.२०२१ रोजीचे सकाळी ०७.०० वा. पर्यंत कडक निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

आयुक्त पी. शिवशंकर, यांनी सोलापूर शहर हद्दीत सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटणेसाठी यापूर्वीच्या आदेशानुसार जे निर्बंध शहरात लागू करणेत आलेले आहेत, त्या निर्बंधामध्ये खालील बाबींचा समावेश करुन सदर निर्बंध दि. १५/०५/२०२१ रोजीचे सकाळी ०७.०० वाजलेपासून ते दिनांक ०१/०६/२०२१ रोजीचे सकाळी ०७.०० वाजेपर्यंत लागू केले आहेत.

१. महाराष्ट्र राज्यात कोणत्याही प्रकारे प्रवास करून शहरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला RTPCR टेस्ट निगेटिव्ह असल्याचे जास्तीत जास्त ४८ तासापूर्वीचे वैध प्रमाणपत्र स्वतःसोबत प्रवेश करताना बाळगणे आवश्यक आहे.

२. देशातील कोणत्याही भागात संवेदनशील ठिकाणाहून (Sensitive Origin) येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोलापूर

शहरात प्रवेश करतेवेळी दि. १८ एप्रिल व दि.०१ मे, २०२१ रोजीच्या आदेशात नमुद केलेल्या सर्व प्रतिबंधात्मक बाबी
लागू राहतील.

३. माल वाहतुक ( Cargo Carriers ) करणाऱ्या वाहनांच्या बाबतीत एकावेळी वाहनामध्ये दोन व्यक्ती ( ड्रायव्हर, क्लिनर, हेल्पर ) पेक्षा जास्त अधिक व्यक्तींना प्रवास करता येणार नाही. जर सदरची माल वाहतुक वाहने महाराष्ट्र राज्याचे बाहेरुन येणार असल्यास त्यांना राज्यात प्रवेश करण्यापूर्वी किमान ४८ तासापूर्वी केलेली RTPCR टेस्ट निगेटिव्ह असल्याचे वैध प्रमाणपत्र सोबत असल्यास प्रवेश देण्यात येईल . तसेच सदरचे प्रमाणपत्र ७ दिवसांपर्यंत वैध असेल.

४. दुधाचे संकलन, वाहतुक व प्रक्रिया तसेच किरकोळ विक्री करण्याकरिता यापूर्वीच्या आवश्यक वस्तू किंवा घरपोच सेवा देण्याबाबत असणाऱ्या निबंधाचे पालन करुन परवानगी असेल.

५. विमानतळ व बंदराच्या ठिकाणी तसेच कोव्हिड -१९ च्या व्यवस्थापणासाठी निगडीत औषधे आणि उपकरणे यांची चढउतार करणारे कर्मचारी यांना स्थानिक पातळीवरील वाहनातून प्रवास करण्यास परवानगी असेल.

कोविड -१९ च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करणेत आलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६०, तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशिर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील. अशा व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांचे विरुध्द संबंधित पोलिस स्टेशनचे अधिकारी यांनी कारवाई करावी. असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

2 thoughts on “आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोलापूर शहराकरिता लॉकडाऊन संदर्भात काढले सुधारित आदेश

  1. सोलापूर जिल्ह्याला लसीकरणाची खूप गरजेचे आहे, त्यासाठी प्रशासन विभाग आणि लोकप्रतिनिधी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, नियम कायदे करा तुम्ही परंतु लसीकरणाची सोय करा

  2. आपत्ती व्यसथाप्पन कायद्यनुसार FIR करता येत नाही स्वतः मा सोमपा आयुक्त यांनी न्यायालयात फिर्याद दाखल करावी लागते विनाकारण fir करून जनतेला त्रास देऊ नये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!