• Solapur
  • August 3, 2021
0 Comments

दि.२१ : भारतात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. देशात लसीकरण सुरू आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरण महत्वाचे आहे. देशात डेल्टा, डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळले त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत होती. अलीकडच्या रिपोर्टमध्ये कोरोनाचा नवा डेल्टा आणि लम्बाडा व्हेरिएंट अँन्टिबॉडिजलाही चकमा देत असल्याचं म्हटलं आहे. अशावेळी लोकांच्या मनात नेमकी कुठली लस सुरक्षा देण्यासाठी सर्वात प्रभावी आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

या प्रश्नाचं उत्तर आता एका शोधाच्या माध्यमातून वैज्ञानिकांनी सांगितल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या स्टडी रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, ऑक्सफोर्डची एस्ट्राजेनेका म्हणजे कोविशील्ड (Covishield) लसीपासून बनणारी अँन्टिबॉडी केवळ कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटपासून लढण्यास सक्षम आहे त्याचसोबत कोरोनाच्या गंभीर संक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यात प्रभावी ठरत आहे. भारताच्या दृष्टीकोनातून या रिपोर्टला विशेष महत्त्व आहे. कारण देशात कोविशील्ड लसीचा सर्वाधिक वापर करण्यात आला आहे.

वैज्ञानिकांचा दावा आहे की, कोविशील्ड लसीपासून बनलेली अँन्टिबॉडी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंसला सहजपणे नष्ट करते. ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेका आणि जॉनसन अँन्ड जॉनसनसारख्या एडेनोवायरस लस शरीरात अशाप्रकारे काम करते ज्याने खूप काळ अँन्टिबॉडी तयार होण्यास मदत मिळते. टी पेशींची निर्मिती आयुष्यभर होऊ शकते. त्याच आधारे कोविशील्ड आणि जॉनसन अँन्ड जॉनसन लस आयुष्यभर सुरक्षित असल्याचं मानलं जात आहे. प्रोफेसर बुकहार्ड लुडविंग म्हणाले की, स्टडी करताना टी पेशींची निर्मिती प्रभावी होत असल्याचं आढळलं. त्यामुळे कोरोनाच्या व्हेरिएंटपासून संरक्षण मिळू शकते. या पेशींना फाइब्रोब्लास्टिक रेटिकुलर सेलही म्हणतात. संक्रमित व्हायरसला शोधून त्याला नष्ट करण्याचं काम टी-पेशी करतात. त्यामुळे संक्रमण संपूर्ण शरीरात पसरत नाही.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!