• Solapur
  • June 19, 2021
0 Comments

दि.१५ : महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. अनेक जिल्ह्यात व शहरात रुग्णसंख्या घटत आहे. महाराष्ट्रातील शहरी भागांसह ग्रामीण भागांमध्ये देखील म्युकरमायकोसिस या आजाराचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. राज्यात सध्या म्युकरमायकोसिस या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दीड हजाराच्या आसपास आहे. या आजाराला पायबंद घालण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलावलेली बैठक महत्वाची ठरणार आहे.

द टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली टास्क फोर्सची बैठक शनिवारी (आज) दुपारी १२ वाजता होणार आहे. म्युकरमायकोसिसचा संसर्ग वेळीच कसा रोखायचा, त्याची नेमकी लक्षणे कोणती आहेत, त्यावर कोणते उपाय योजावे लागणार आहेत याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. या बरोबरच या आजारावरील राज्यात औषधांची उपलब्धता कमी असून ती कशी वाढवावी यावर देखील चर्चा होणार आहे.

म्युकरमायकोसिस या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णाला एम्फेटेरेसिन-बी हे इंजेक्शन दिले जाते. मात्र हे इंजेक्शन महाग आहे. सर्वसामान्यांना ते परवडणारे नाही. त्यावर देखील या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. या इंजेक्शनची किंमत कमी करण्यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी नुकतीच चर्चा केली आहे.

रविवारी डॉक्टरांसाठी खास कार्यक्रम
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनावर उपचार या विषयावर रविवारी, १६ मे रोजी दुपारी १२ वाजता डॉक्टरांसाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या टास्क फोर्सच्या सदस्यस्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या सदस्यांमध्ये डॉ. संजय ओक, डॉ. शशांक र जोशी आणि डॉ. राहुल पंडित यांचा समावेश आहे.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!