• Solapur
  • May 15, 2021
0 Comments

दि.19 : महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु नागरिकांकडून कोरोना निर्देशांचे पालन होताना दिसत नाही. रस्त्यांवर गर्दी दिसून येते.

या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील. गरज पडली तर कालावधी वाढू शकेल, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. लॉकडाऊन आतापर्यंत 30 तारखेपर्यंत आहे. ती मुदत वाढवावी लागेल, असं ते म्हणाले. 

विजय वडेट्टीवार म्हणाले की, लॉकडाऊन काळात लोकांना मदत करण्याबाबत आढावा घेतला. पुढच्या आठवड्यात सगळ्यांना मदत मिळाली पाहिजे. ते म्हणाले की, नाभिक समाजाला मदत कशी करायची यावर विचार सुरु आहे. माहिती गोळा करून कशी मदत करायची यावर चर्चा सुरु आहे. बांधकाम कामगार ,ऑटो रिक्षाचालकांच्या नोंदी आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, अद्याप केंद्राने पैसे दिले नाहीत. आजची गरज आहे. आमच्या खात्याला 1600 कोटी अपेक्षित आहेत ते आले नाहीत.

ऑक्सिजनसंदर्भात ते म्हणाले की, तामिळनाडू 52 टँकर निघाले आहेत. ते पोहोचत आहेत. ऑक्सिजनसाठी केंद्राला विनंती केली आहे. आता दिले तर इतक्या लांबचे ऑक्सिजन दिले. रस्त्याने 10 दिवस लागले असते, असं ते म्हणाले. दुःख आहे की बेड मिळू शकत नाहीत. मात्र आम्ही प्रयत्न करतो आहोत, रात्री दोन अडीच वाजेपर्यंत काम करतोय, असं ते म्हणाले.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *