
सोलापूर,दि.७ : कोरोना रुग्ण संख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सोलापूरात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या मिनी लॉकडाउनमुळे शहरातील व्यापारी वर्गात नाराजी पसरली असून आठवड्यातील पाच दिवस व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र देऊन केली आहे.
छोटे – मोठे दुकानदार, स्टेशनरी, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, सिमेंट, स्टील, फर्निचर, मोबाइल, फुटवेअर आदी वस्तू ऑनलाइन विकल्या तर इतर व्यापारी वर्गावर मोठा अन्याय होईल आणि मोठे आर्थिक नुकसानही होईल. त्यासाठी जीवनावश्यक वस्तू नसलेल्या इतर व्यापार व्यवसायाला आठवड्यातून पाच दिवस परवानगी देण्याचा सुधारित आदेश काढावा, अशी मागणी चेंबरचे अध्यक्ष राजू राठी, सचिव धवल शहा यांनी केली आहे.