• Solapur
  • June 19, 2021
0 Comments

सोलापूर,दि.14 : जुळे सोलापुरातील संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयामध्ये स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या 364 व्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहराध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

14 व्या वर्षी संस्कृत पंडीत संभाजी महाराजांनी वयाच्या 14 व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहून संस्कृत पंडीत झाले. त्या नंतर नखशिख, नायिकाभेद, सातशतक हे ग्रंथ ब्रज भाषेत लिहुन लेखनाची मक्तेदारी त्यांनी मोडीत काढली असे मनोगत शहराध्यक्ष श्याम कदम यांनी व्यक्त केले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहर उपप्रमुख सिताराम बाबर शहर उपाध्यक्ष अशितोष माने आर्यन कदम शहर संघटक संजय भोसले ओमकार कदम सागर सलगर शिवशरण बोरटे इत्यादी उपस्थित होते.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!