• Solapur
  • June 19, 2021
0 Comments

सोलापूर : मानव हाच धर्म… स्त्री आणि पुरुष या दोन जाती असा संदेश देऊन तमाम विश्वात समतेचा संदेश देणाऱ्या महात्मा बसवेश्वर त्यांच्या प्रतिमे पुढे नतमस्तक होताना वीरशैव व्हिजनच्या कार्यकर्त्यांनी ‘बसवण्णा, विश्वातील तमाम मानवजातीला कोरोनातून मुक्त कर आणि कोरोनाशी लढण्यासाठी आम्हाला बळ दे’ असे साकडे घालून महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करण्यात आले. बसवेश्वर जयंतीवर होणारा खर्च टाळून कोरोनाग्रस्तांना मदत वीरशैव व्हिजनच्या वतीने करण्यात येणार असून याद्वारे त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
               
संपूर्ण देशात कोरोनामुळे लॉककडाऊन करण्यात आले आहे. सध्या सोलापुरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने कडक संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे वीरशैव व्हीजनने यावर्षी ‘बसवजयंती मनामनात, बसवजयंती घराघरात’ ही संकल्पना घेऊन बसव प्रेमींना घरातच बसव जयंती साजरी करण्याचे आवाहन केले होते.  
        
त्याप्रमाणे बसवप्रेमींनी घरातच जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची स्थापना केली. बसवण्णांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचे व कार्याचे स्मरण करण्यात आले. तसेच संपूर्ण जगावरील करण्याचे संकट लवकरच दूर व्हावे अशी प्रार्थना बसवण्णा यांच्या चरणी करण्यात आली.

यावेळी सोलापूर बार असोसिएशनचे माजी सचिव ॲड. अमित आळंगे, वीरशैव व्हीजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष सोमेश्वर याबाजी, सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, युवक आघाडी उपाध्यक्ष सोमनाथ चौधरी, सामाजिक कार्यकर्ते पिनू करपे उपस्थित होते.
            
वीरशैव व्हीजनतर्फे  प्रतिवर्षी बसव व्याख्यानमाला व बसव सप्ताह रद्द करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी संस्थेच्यावतीने कोरोनाबाबत ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा, सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष मोबाईलद्वारे संपर्क साधून जनजागृती करण्यात येत आहे.

Author

aajtaksolapurnews@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!